आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खास भेट:कंगना रनोटने घेतली योगी आदित्यनाथांची भेट, अभिनेत्री आहे 'एक जिल्हा एक उत्पादन' योजनेची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'एक जिल्हा एक उत्पादन' योजनेची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे कंगना

अभिनेत्री कंगना रनोटने नुकतीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. कंगना उत्तर प्रदेशच्या वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट (ODOP) योजनेची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे. या संदर्भात तिने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यांच्या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना कंगनाने लिहिले, "विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर आज मला महाराज योगी आदित्यनाथजींना भेटण्याचे सौभाग्य मिळाले. ती एक अद्भुत संध्याकाळ होती."

'एक जिल्हा एक उत्पादन' योजनेची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे कंगना
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये यूपीच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर कंगनाला राज्य सरकारच्या वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट कार्यक्रमाची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवण्यात आले होते. वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट (एक जिल्हा एक उत्पादन) हा यूपी सरकारचा एक प्रमुख कार्यक्रम आहे. स्वदेशी आणि विशिष्ट उत्पादने, शिल्प जी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची ओळख आहेत, प्रत्येक जिल्ह्यात आहेत त्यांना प्रोत्साहन देण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

कंगनाने नेसली होती चिकनकारी वर्क असलेली साडी
या भेटीदरम्यान कंगनाने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. या साडीवर चिकनकारी वर्क करण्यात आले आहे. ही साडी उत्तर प्रदेशातील चिकनकारी कलाकारांनी बनवली आहे. सरकारचे म्हणणे आहे की, नक्षीकाम, भरतकाम, काळे मीठ इत्यादी काही उत्पादने उत्तर प्रदेशातील जिल्ह्यांमध्ये तयार केली जातात, जी इतर कुठेही तयार केली जात नाहीत.

कंगनाचे आगामी प्रोजेक्ट्स
कंगना रनोटचा आगामी चित्रपट 'धाकड' हा आहे. हा चित्रपट येत्या 20 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत दिव्या दत्ता आणि अर्जुन रामपाल देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. याशिवाय 'तेजस' हा चित्रपट 5 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. सध्या कंगना OTT रिअॅलिटी शो 'लॉक-अप' होस्ट करत आहे.

बातम्या आणखी आहेत...