आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगनाची पुन्हा एकदा न्यायालयात धाव:कंगनाच्या विरोधात दाखल आहे देशद्रोहाची तक्रार, सप्टेंबरमध्ये एक्सपायर होणार पासपोर्ट पण नूतनीकरणास प्राधिकरणाचा नकार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशद्रोहाच्या आरोपामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ

अभिनेत्री कंगना रनोटला पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली आहे. यावेळी प्रकरण कंगनाच्या पासपोर्ट रिन्यूअल म्हणजेच नूतनीकरणाचे आहे. कंगनावर वांद्रे पोलिस स्थानकात देशद्रोहाचा गुन्हा दाखल असल्याने तिच्या पासपोर्ट नूतनीकरणासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. आता कंगनाला तिच्या आगामी धाकड या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बुडापेस्टला जायचे आहे, मात्र पासपोर्ट विभागाने तिच्याविरोधात दाखल असलेल्या एफआयआरमुळे तिच्या पासपोर्ट रिन्यूअलवर आक्षेप नोंदवला आहे.

सप्टेंबरमध्ये एक्सपायर होणार कंगनाचा पासपोर्ट

कंगनाचा कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले, 'मी एक अभिनेत्री आहे, त्यामुळे कामानिमित्त मला देश-विदेशात प्रवास करावा लागतो. एका चित्रपटात मी मुख्य भूमिका साकारत आहे, त्यासाठी 15 जून ते 10 ऑगस्ट या काळात बूडापेस्ट आणि हंगेरीमध्ये प्रवास करायाचा आहे. ' कंगनाने सांगितल्याप्रमाणे, तिचा पासपोर्ट 15 सप्टेंबरपर्यंतच वैध असल्याने तिला पासपोर्टचे तातडीने नूतनीकरण करणे गरजेचे आहे. अन्यथा तिला परदेशवारी करण्यात मर्यादा येऊ शकतात.

15 जून रोजी होणार सुनावणी मंगळवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
कंगनाने वकील रिजवान सिद्दीकी यांच्या मार्फत याचिका दाखल केली आहे. कंगनाने आधीच शूटिंगसाठी कमिटमेंट केल्या आहेत. परदेशात प्रॉडक्शन हाऊसकडूनही सर्व तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे कंगनाचे तिथे पोहचणे महत्वाचे आहे, असे म्हणत पासपोर्ट रिन्यू करण्यात यावे अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी 15 जून रोजी न्यायाधीश पीबी वराले आणि एसपी तावडे यांच्या खंडपीठासमोर होणार आहे.

ऑक्टोबर 2020 मध्ये दाखल झाली होती तक्रार
कंगना आणि तिची बहीण रंगोली यांच्याविरोधात 17 ऑक्टोबर रोजी वांद्रे पोलिसांनी मुन्नावरली सय्यद यांच्या तक्रारीवरून आयपीसी कलम 133 ए (विविध धार्मिक गटांमध्ये वैर वाढवणे), 295 ए (धार्मिक भावना दुखावणे), 124 ए (देशद्रोह) आणि 34 (षडयंत्र) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...