आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरटीआयमध्ये खुलासा:कंगना रनोटविरुद्धच्या खटल्यासाठी मुंबई महापालिकेने खर्च केले 82 लाख रुपये, कंगना म्हणाली- एका मुलीला डिवचण्यासाठी पप्पांच्या पप्पूने जनतेचा पैसा खर्च केला

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वकिल अस्पि चिनॉय यांना आतापर्यंत 82 लाख 50 हजार रुपये फी म्हणून मुंबई महापालिकेने अदा केले आहेत.

अभिनेत्री कंगना रनोटच्या मुंबईतील पाली हिल्सस्थित कार्यालयात 9 सप्टेंबर रोजी मुंबई महापालिकेने अनधिकृत बांधकामाचे कारण देत तोडफोड केली होती. त्यानंतर कंगनाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, बीएमसीची ही कारवाई बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे आपली बाजू कोर्टात मांडण्यासाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत तब्बल 82 लाख रुपयांचा खर्च केल्याची माहिती पालिकेने माहिती अधिकारात दिली आहे.

आरटीआयवर बीएमसीचे उत्तर
मुंबई महापालिकेने कंगनाला बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी 354 कलमान्वये नोटीस बजावली होती. या नोटीसीला योग्य उत्तर दिले नसल्याने पालिकेने कंगनाच्या मणिकर्णिका फिल्म्स या कार्यालयातील बेकायदेशीर बांधकाम तोडले होते. याप्रकरणी कंगनाने उच्च न्यायालयात धाव घेत दाद मागितली होती. त्यानंतर बेकायदेशीर काम तोडण्यास उच्च न्यायालयाने स्टे दिला आहे.

या प्रकरणी मुंबई महापालिकेने कोणत्या वकिलाची नियुक्ती केली आणि त्यांना किती रक्कम अदा करण्यात आल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शरद यादव यांनी मागितली होती. याबाबत माहिती देताना या प्रकरणी पालिकेची बाजू उच्च न्यायालयात मांडण्यासाठी अस्पि चिनॉय यांची वकील म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना पालिकेकडून 22 सप्टेंबर रोजी 7 लाख 50 हजार रुपये तीनदा तर 7 ऑक्टोबर रोजी 7 लाख 50 हजार रुपये असे आठ वेळा दिले गेले. असे एकूण 82 लाख 50 हजार रुपये त्यांना फी म्हणून अदा केले आहेत अशी माहिती पालिकेच्या कायदा विभागाने दिली आहे.

कंगना म्हणाली - एखाद्याला डिवचण्यासाठी जनतेचा पैसा खर्च केला जातोय
माहिती अधिकारात हा खुलासा झाल्यानंतर अभिनेत्री कंगना रनोट हिने बुधवारी ट्विट करुन पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला. कंगनाने ट्विट केले, 'माझ्या घरातील बेकायदेशीर तोडफोडीसाठी मनपाने आतापर्यंत 82 लाख रुपये खर्च केले आहेत. पप्पांच्या पप्पूने एका मुलीला डिवचण्यासाठी जनतेचा पैसा खर्च केला, आज महाराष्ट्र या ठिकाणी उभा आहे, अत्यंत दुर्दैवी', असे कंगना म्हणाली आहे.

नितेश राणे म्हणाले- पेंग्विनवर खर्च होतोय जनतेचा पैसा

भाजप नेते नितेश राणे यांनीही कंगना रनोट प्रकरणासाठी बीएमसीच्या उधळपट्टीवर टीका केली आहे. त्यांनी ट्विट केले, 'वाह! मुंबईकर यासाठी कर भरत आहेत... 1- पेंग्विनसाठी. 2- कंगनाविरुद्धचा खटला लढण्यासाठी वकिलांना पैसे दिले जात आहेत. आता काय शिल्लक राहिले? त्यांच्या मुलांची लग्नदेखील आमच्या पैशांतूनच होतील, असे दिसतेय!!', अशी खोचक टीका नितेश राणेंनी केली आहे.