आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेत्री कंगना रनोट आणि शिवसेना यांच्यातील वाद शमण्याची चिन्हं दिसत नाहीयेत. आता महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, कंगनाची ड्रग्ज प्रकरणात चौकशी केली जाईल. अध्ययन सुमन (शेखर सुमनचा मुलगा) च्या मुलाखतीचा आधारे ही कारवाई केली जाणार आहे. अध्ययनने कंगनावर अनेक आरोप केले आहेत. यावर कंगनानेही तिची प्रतिक्रिया दिली आहे. जर माझ्याशी संबंधित ड्रग्ज कनेक्शनचा पुरावा मिळाला तर मुंबई कायमची सोडेल, असे कंगना म्हणाली आहे.
कंगनाने प्रतिक्रिया देताना म्हटले, "मुंबई पोलिस आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या या उपकारांमुळे मी खूप खूष आहे. कृपया माझी चाचणी घ्या. माझे कॉल रेकॉर्ड तपासा. जर आपल्याला ड्रग पेडलरकडून काही दुवा मिळाला तर मी माझी चूक स्वीकारेल आणि कायमची मुंबई सोडून जाईल. तुम्हाला भेटण्याची वाट बघतेय."
अध्ययनने डीएनए वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, "एका पार्टीत कंगनाने मला जोरदार चापट मारली होती, तेव्हा मला रडू कोसळले होते. नंतर तिने मला कारमध्ये मारहाण केली. मी ती रात्र कधीही विसरू शकत नाही. मी तिला घरी सोडल्यावर तिने मला सँडल फेकून मारली होती. माझा फोन भिंतीवर जोरात आपटून तोडला. कंगनाने मला घरी बोलावले आणि स्वतःच्या चांगल्या करिअरसाठी पूजा केली आणि रात्री 12 वाजता स्मशानभूमीवर काही वस्तू मला फेकायला लावल्या", असा खुलासा अध्ययने या मुलाखतीत केला होता.
मंगळवारी शिवसेनेच्या आयटी सेलने ठाणे जिल्ह्यातील श्रीनगर पोलिस ठाण्यात कंगनाविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यामुळे तिच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असे म्हटले आहे.
दुसरीकडे, बीएमसीने आज कंगनाच्या मुंबईस्थित ऑफिसमध्ये बेकायदा बांधकामांची नोटीस चिकटवली असून तिच्याकडे 24 तासांत उत्तर मागितले आहे. याबद्दल स्वत: कंगनाने ट्विटद्वारे माहिती दिली. तिने लिहिले, ''सोशल मीडियावरील माझ्या मित्रांनी बीएमसी विरोधात संताप व्यक्त केला होता म्हणून त्यांनी आज बुलडोझर आणला नाही. परंतु, ऑफिसमध्ये नोटीस चिकटवली आहे. मित्रांनो येणारे दिवस माझ्यासाठी खूप धोकादायक असू शकतात, परंतु आपले प्रेम आणि समर्थन मिळत आहे.''
Because of the criticism that @mybmc received from my friends on social media, they didn’t come with a bulldozer today instead stuck a notice to stop leakage work that is going on in the office, friends I may have risked a lot but I find immense love and support from you all 🙏 pic.twitter.com/2yr7OkWDAb
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 8, 2020
1. ग्राऊंड फ्लोअरवर टॉयलेटला ऑफिस केबिन बनवले.
2. स्टोअर रूममध्ये किचन बनवले गेले.
3. स्टोअरमध्ये पाय-यांजवळ आणि पार्किंग एरियात नवीन शौचालये बांधली जात आहेत.
4. तळ मजल्यावरील पॅन्ट्री तयार केली जात आहे.
5. पहिल्या मजल्यावरील लिव्हिंग रूममध्ये लाकडी विभाजन करुन खोली / केबिन तयार केले जात आहे.
6. पहिल्या मजल्यावर पूजेच्या कक्षात पार्टिशन करुन मीटिंग रुम / केबिन बनवले गेले.
7. पहिल्या मजल्यावरील मोकळ्या जागेत टॉयलेट बांधले गेले.
8. दुसर्या मजल्यावरील पायर्याची जागा बदलली गेली.
9. पहिल्या मजल्यावरील आडव्या पद्धतीने 2.बाय 6. चा स्लॅब वाढवला गेला.
10. दुसर्या मजल्यावरील भिंत काढून बाल्कनी बनवली गेली.
कंगना रनोट ही येत्या 9 सप्टेंबरला मुंबईत येणार आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या Y+ सिक्युरिटीत ती मुंबईत दाखल होणार आहे. कंगना मुंबईत आल्यानंतर तिला नियमानुसार होम क्वारंटाईन केले जाईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. “येत्या बुधवारी (9 सप्टेंबर) कंगना रनोट ही हिमाचल प्रदेशातून मुंबईत येणार आहे. त्यामुळे परराज्यातून आलेल्या व्यक्तीला नियमानुसार होम क्वारंटाइन केले जाते. त्यामुळे नियमानुसार कंगनाच्या हातावरही विमानतळावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारला जाणार आहे”, असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाला हरामखोर असे म्हणत हिणवले होते. त्यावरुन गदारोळ उठल्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना या शब्दाच्या वापराबाबत राऊत यांनी स्पष्टीकरण दिले. अभिनेत्री कंगना रनोट म्हणजे नॉटी गर्ल आहे असे वक्तव्य राऊत यांनी सोमवारी केले. कंगनाला 'नॉटी गर्ल' आणि 'बेईमान' म्हणायचे होते असे ते म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.