आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जावेद अख्तर आणि संजय राऊत यांच्यावर भडकली कंगना:'एक थी शेरनी .... और एक भेड़ियों का झुंड'; संजय राऊतांच्या ट्विटवर कंगना रनोटची प्रतिक्रिया

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगना रनोट हिने आपल्या विरोधकांवर निशाणा साधला आहे.

प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रनोट हिच्याविरोधात अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल केल्याचे वृत्त मंगळवारी समोर आले होते. संजय राऊत यांनीच ट्विट करून ही माहिती दिली होती. त्यानंतर कंगनाने जावेद अख्तर आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत राऊतांचे हे ट्विट टॅग करत रिप्लाय दिला आहे. ‘एक थी शेरनी ….. और एक भेड़ियों का झुंड’, असे कॅप्शन लिहित तिने आपल्या विरोधकांवर निशाणा साधला आहे.

जावेद अख्तर यांनी अभिनेता हृतिक रोशन याच्याविरोधात बोलू नये यासाठी दबाव टाकल्याचा आरोप कंगनाने अनेक मुलाखतींमध्ये केला आहे. याशिवाय कंगनाची थोरली बहीण रंगोली हिनेदेखील सुमारे आठ महिन्यांपूर्वी यासंदर्भात एक ट्विट केले होते. त्यामुळे या आरोपांविरोधात जावेद यांनी कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केल्याचे समजते.

रिपोर्टमध्ये दावा - जावेद अख्तर यांनी धमकी दिली नव्हती
स्पॉटबॉयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, जावेद अख्तर यांनी कंगनाला धमकी दिली नव्हती. आता हे प्रकरण कोर्टात पोहोचले असून जावेद अख्तर दीर्घ लढाई लढण्यास तयार आहेत. कोर्टाबाहेर हे प्रकरण सामंजस्याने सोडवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे म्हटले गेले आहे.

कंगनाची मॅनेजर आणि थोरली बहीण रंगोलीने 8 महिन्यांपूर्वी केले होते ट्विट
कंगनाची बहीण आणि मॅनेजर रंगोली चंदेल हिने ट्विट करुन जावेद अख्तर यांनी कंगनाला धमकावल्याचा आरोप केला होता. तिने लिहिले होते, "जावेद अख्तर यांनी कंगनाला घरी बोलावले आणि हृतिक रोशनची माफी मागण्याची धमकी दिली. महेश भट्टच्या चित्रपटात सुसाइड बॉम्बरची भूमिका साकारण्यास नकार दिल्याने महेश भट्ट यांनी कंगनावर चप्पल फेकली होती. ते पंतप्रधानांना फॅसिस्ट म्हणतात .... चाचाजी तुम्ही दोघे काय आहात?", अशा आशयाचे ट्विट करुन रंगोलीने जावेद अख्तर आणि महेश भट्ट यांच्यावर निशाणा साधला होता.

मुलाखतींमध्ये काय म्हणाली होती कंगना?
काही दिवसांपूर्वी कंगनाने एका मुलाखतीत जावेद यांच्यावर गंभीर आरोप केले होते. “एकदा जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलवून सांगितले होते की, राकेश रोशन आणि त्यांचे कुटुंबीय खूप मोठे लोक आहेत. तू जर त्यांच्याविरोधात माफी मागितली नाही तर तुझे नुकसान होईल. ते तुला जेलमध्ये टाकतील. त्यावेळी तुझ्या हातात काहीच राहणार नाही. त्यावेळी तुला आत्महत्या करावी लागेल, असे त्यांचे शब्द होते. त्यांना असे का वाटतं की, मी जर हृतिक रोशनची माफी नाही मागितली तर मला आत्महत्या करावी लागेल. ते माझ्यावर इतक्या जोरात ओरडले होते की माझे पाय कापयला लागले होते”, अशी कंगना त्या मुलाखतीत म्हणाली होती.

हृतिक रोशन-कंगना रनोट वाद काय होता?
2009 पासून 2013 पर्यंत कंगना हृतिकसोबत रिलेशनशिपमध्ये होती. ब्रेकअपनंतर या दोघांमध्ये बराच वाद झाला होता. 2016 मध्ये एका कार्यक्रमात कंगनाने हृतिकचा उल्लेख सिली एक्स म्हणून केला होता. शिवाय रिलेशनशिप दरम्यान हृतिकने तिला केलेले मेल्स आपल्याकडे पुरावा म्हणून असल्याचा दावा तिने केला होता. यावरुन हृतिकने कंगनाविरोधात मुंबई गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली होती.

गेल्या महिन्यात कंगनाच्या विरोधात 3 गुन्हे दाखल करण्यात आले
ऑक्टोबरमध्ये कर्नाटकच्या तुमकुरमध्ये कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिच्यावर शेतक-यांचा अपमान केल्याचा आरोप होता. यानंतर मुंबईत 2 प्रकरणे नोंदली गेली. यामध्ये कंगनावर धर्माच्या आधारे द्वेष पसरवण्याचा आणि कोर्टाचा अवमान केल्याचा आरोप होता.