आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नॅशनल यूथ डे:कंगना रनोटने स्वामी विवेकानंद स्वामींच्या जयंतीनिमित्त शेअर केली नोट, म्हणाली - 'तुम्ही मला जगण्यासाठी उद्देश दिलात, तुम्हीच माझे गुरु'

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाने स्वामी विवेकानंद यांना अभिवादन केले आहे.

अभिनेत्री कंगना रनोट हिने स्वामी विवेकानंद यांच्या 158 व्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने भारतात नॅशनल यूथ डे साजरा केला जातो. यानिमित्ताने स्वामी विवेकानंद आपले गुरु आहेत, असा दावा करत कंगनाने देशभरातील लोकांना त्यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कंगनाची पोस्ट
कंगनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, 'प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही मला लढण्याची प्रेरणा दिली. जेव्हा मी नैराश्येत होते तेव्हा तुम्ही मला जगण्यासाठी उद्देश दिलात. तुम्ही माझे ईश्वर आहात. आणि तुम्हीच माझे गुरु,' अशा आशयाची पोस्ट शेअर करत कंगनाने स्वामी विवेकानंद यांना अभिवादन केले आहे. सोबतच तिने #NationalYouthDay #SwamiVivekanandJayanti।" हे हॅशटॅगही जोडले आहेत.

'धाकड'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे कंगना
कंगनाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे म्हणजे, सध्या ती मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये 'धाकड' चित्रपटाचे शुटिंग करत आहे. या चित्रपटात कंगनाशिवाय अर्जुन रामपाल देखील मुख्य भूमिकेत आहे. या
स्पाय थ्रिलर चित्रपटात कंगना एका महिला गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर अर्जुन हा खलनायकाच्या भूमिकेत आहे. जो वेश्या व्यवसायाबरोबरच शस्त्र व ड्रग्जची तस्करी करतो.

कंगनाचा 'थलायवी' लवकरच होणार प्रदर्शित
याआधी कंगनाने 'तेजस' या चित्रपटाच्या काही शेड्युलचे शूटिंग पूर्ण केले. या चित्रपटात कंगना हवाई दलाच्या अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी कंगना तिच्या आगामी ‘थलायवी’ (जयललितांचा बायोपिक) चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून लवकरच हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...