आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेकअप आर्टिस्ट बलात्कार प्रकरण:कंगना रनोटचा पर्सनल बॉडीगार्ड कुमार हेगडेला अटक, कर्नाटकातून पोलिसांनी घेतले ताब्यात

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 30 वर्षीय मेकअप आर्टिस्टने कुमार हेगडेवर बलात्काराचा आरोप केला आहे.

अभिनेत्री कंगना रनोटचा पर्सनल बॉडीगार्ड कुमार हेगडेला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर मुंबईतील मेकअप आर्टिस्टवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. कर्नाटकातील हेगडाहल्ली या त्याच्या गावातून पोलिसांना त्याला ताब्यात घेतले आहे. कुमार लग्न करण्यासाठीच त्याच्या गावी गेला होता. कर्नाटकात तपासासाठी गेलेल्या मुंबई पोलिसांनी पीडित महिला आणि तिची मैत्रीण दिव्या कोटीयान यांनादेखील सोबत कर्नाटकात नेले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मूळ गावी तपास केला असता कुमार हेगडे पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी स्थानिक पोलिस ठाण्यात सर्व प्रक्रिया पूर्ण करून कुमार हेगडेला मुंबईत आणले आहे.

12 दिवसांपूर्वी मुंबईत दाखल झाला होता गुन्हा
कुमार हेगडेवर लग्नाचे आमिष दाखवून अनेकवेळ जबरदस्ती बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार आणि 50 हजार रुपये घेतल्याचा केल्याचा आरोप आहे. 30 वर्षीय मेकअप आर्टिस्टने 12 दिवसांपूर्वी मुंबईतील के डी एन नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरुन कलम 376, 377 आणि 420 अन्वये गुन्हा दाखल केला होता.

पीडितेने आपल्या तक्रारीत सांगितले होते की, ती 8 वर्षांपूर्वी आरोपीच्या संपर्कात आली होती. गेल्या वर्षी जूनमध्ये आरोपीने तिला लग्नाची मागणी घातली होती. त्यानंतर हेगडेने तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा कंगनाच्या टीमशी संपर्क साधून कुमार हेगडेविषीय विचारणा केली असता,तो दीर्घकाळापासून रजेवर असल्याचे त्यांनी सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...