आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगना रनोटच्या बॉडीगार्डवर गुन्हा दाखल:लग्नाचे आमिष दाखवून 30 वर्षीय ब्यूटीशियनवर बलात्कार, आरोपीला 8 वर्षांपासून ओळखते पीडित तरुणी

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पीडित तरुणी ही व्यवसायाने ब्यूटीशियन आहे.

मुंबईतील डीएन नगर पोलिस ठाण्यात अभिनेत्री कंगना रनोटच्या बॉडीगार्डविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुमार हेगडे असे आरोपीचे नाव आहे. 30 वर्षीय पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, कुमार हेगडे हा अभिनेत्री कंगना रनोटचा पर्सनल बॉडीगार्ड आहे. लग्नाचे आमिष दाखवून त्याने पीडितेवर बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले गेले आहे.

बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 376, 377 आणि 420 अन्वये गुन्हा दाखल करून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. पीडित तरुणी ही व्यवसायाने ब्यूटीशियन आहे.

8 वर्षांपूर्वी आरोपीच्या संपर्कात आली होती पीडित तरुणी
पीडितेने आपल्या तक्रारीत सांगितले की, ती 8 वर्षांपूर्वी आरोपीच्या संपर्कात आली होती. गेल्या वर्षी जूनमध्ये आरोपीने तिला लग्नाची मागणी घातली होती. त्यानंतर हेगडेने तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा कंगनाच्या टीमशी संपर्क साधून कुमार हेगडेविषीय विचारणा केली असता,तो दीर्घकाळापासून रजेवर असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...