आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फॅमिली टाइम:कुटुंबीयांसोबत कंगना रनोटने एन्जॉय केली पिकनिक, डोंगरद-यात आणि सरोवरात मस्ती करताना दिसली

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ग्रीन झोनमध्ये असूनही, परवानगीसाठी आम्हाला एक लांब प्रक्रिया करावी लागली, असे कंगनाच्या बहिणीने सांगितले.

लॉकडाऊनपासून अभिनेत्री कंगना रानोट आपल्या मनालीतील घरी कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे. निवांत क्षण एन्जॉय करत असलेल्या कंगनाने अलीकडेच कुटुंबासोबत एका सहलीचे आयोजन केले होते. येथे ती सगळ्यांसोबत मस्तीच्या अंदाजात दिसली.

कंगनाच्या टीमने अधिकृत अकाऊंटवरुन कंगनाच्या पिकनिकची खास झलक शेअर केली आहे, ज्यात कंगना कधी तलावाच्या पाण्याचा आनंद घेत आहे तर कधी डोंगरद-यात मस्ती करताना दिसतेय. व्हिडिओमध्ये कंगना, तिची बहीण रंगोलीचे कुटुंब, पालक आणि काही जवळचे नातेवाईक दिसत आहेत. व्हिडिओ आणि फोटोसह कॅप्शनमध्ये लिहिले की, 'कंगनाने तिच्या कुटुंबीयांसाठी सहलीचे आयोजन केले होते. लॉकडाऊनमुळे मनालीत पर्यटक नाहीत. यामुळे तिला अनेक वर्षांपासून न मिळालेला आनंदी वेळ मिळाला.'

कंगनाशिवाय तिची बहीण रंगोली चंदेलने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन आऊटिंगचे काही फोटो शेअर केले आहेत. याविषयी रंगोलीने सांगितले की, 'आमच्या पालकांच्या सांगण्यानुसार कंगनाने कुटुंबासाठी सहलीची योजना आखली. पाऊस येण्यापूर्वी तिला उन्हाळ्यातील काही क्षणांचा घराबाहेर आनंद घ्यायचा होता. ग्रीन झोनमध्ये असूनही, परवानगीसाठी आम्हाला एक लांब प्रक्रिया करावी लागली. आम्हाला मदत केल्याबद्दल हिमाचलच्या सर्व अधिका-यांचे आभार. ही एक महत्त्वाची सहल होती', असे रंगोलीने सांगितले. 

On our parents request Kangana planned a picnic for the family, before the rains here they wanted to enjoy summer outdoors, even though we are in green zone but it was a long a tedious process to get permissions, thanking all the authorities in Himanchal to help us with required permissions, it was a much needed family outing 🙏🙏🙏

A post shared by Rangoli Chandel (@rangoli_r_chandel) on Jul 4, 2020 at 12:06am PDT

लॉकडाउन सुरू होण्यापूर्वीच कंगना मनालीत आपल्या कुटूंबाकडे पोहोचली. इंडस्ट्रीत आल्यानंतर कंगनाने आपल्या कुटुंबासमवेत पहिल्यांदाच इतका वेळ घालवला आहे. अलीकडेच तिची बहीण रंगोलीने एक नवीन घर घेतले असून त्याचे इंटेरियर कंगनाने केले आहे. 

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser