आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगनाला आवडला 'शेरशाह':कंगना रनोटने करण जोहर निर्मित 'शेरशाह' चित्रपटाची केली प्रशंसा, म्हणाली, 'ही विक्रम बत्रांना खरी मानवंदना आहे'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगना म्हणाली, 'शेरशाहच्या टीमने चांगले काम केले'

चित्रपट निर्माता करण जोहरसोबतच्या वादांसाठी प्रसिद्ध असलेल्या कंगना रानोटने सोशल मीडियावर त्याचे कौतुक करून सर्वांना आश्चर्याचा मोठा धक्का दिला आहे. कंगनाने करण जोहरची निर्मिती असलेला शेरशाह हा चित्रपट पाहिल्यानंतर संपूर्ण टीमसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे.

कंगना म्हणाली, 'शेरशाहच्या टीमने चांगले काम केले'
कंगनाने लिहिले, 'नॅशनल हीरो विक्रम बत्रा हे पालमपूरचे लोकप्रिय जवान होते. जेव्हा ही शोकांतिका घडली तेव्हा हिमाचलमध्ये ही बातमी आगीसारखी पसरली आणि प्रत्येक जण अस्वस्थ झाला. मला लहानपणी ही बातमी ऐकल्याचे आठवते, मी बरेच दिवस यामुळे दुःखी होते.' या व्यतिरिक्त, आणखी एका पोस्टमध्ये कंगनाने सिद्धार्थ मल्होत्राचा 'शेरशाह' चित्रपटातील एक फोटो शेअर केला आणि लिहिले, 'ही विक्रम बत्रांना खरी मानवंदना आहे. संपूर्ण टीमचे अभिनंदन. ही एक मोठी जबाबदारी होती आणि तुम्ही सर्वांनी उत्तमपणे ती पार पाडली आहे.'

धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार झाला 'शेरशाह'
या चित्रपटाचे दिग्दर्शन विष्णू वर्धन यांनी केले आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्मित हा चित्रपट कॅप्टन विक्रम बत्रा यांची वीर गाथा आहे. कारगिल युद्धात कॅप्टन विक्रम बत्रा शहीद झाले होते. त्यांच्या शौर्यासाठी त्यांना मरणोत्तर परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले होते. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राने ​​विक्रम बत्रा आणि कियारा अडवाणीने त्यांची मैत्रीण डिंपल चीमाची भूमिका साकारली आहे.

जेव्हा करणच्या शोमध्येच कंगनाने त्याच्यावर निशाणा साधला होता
चार वर्षांपूर्वी कंगना रानोट करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये सहभागी झाली होती. तिथे तिने करणवर बॉलिवूडमध्ये नेपोटिझमला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला होता. कंगना म्हणाली होती की, जर तिने कधी बायोग्राफी लिहिली तर त्यात नेपोटिझमवर एक चॅप्टर असेल आणि ते करणला समर्पित असेल. यानंतर कंगनाने अनेक वेळा करणवर नेपोटिझमला प्रोत्साहन दिल्याचा आरोप लावला आहे.

गेल्या वर्षी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतरही कंगनाने करणवर जोरदार निशाणा साधला होता. यानंतर, करण ट्रोलिंगमुळे इतका नाराज झाला की, त्याने सोशल मीडियावर सर्वांना अनफॉलो केले, फक्त 8 अकाउंट वगळता (ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मेगास्टार अमिताभ बच्चन, अभिनेता अक्षय कुमार आणि शाहरुख खान आणि त्याच्या प्रॉडक्शन हाऊसशी संबंधित असलेले काही जण) इतरांना अनफॉलो केले होते.

बातम्या आणखी आहेत...