आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगनाने आलिया भट्टला केले लक्ष्य:कंगना रनोटने आलिया भट्टच्या 'गंगूबाई काठियावाडी'वर साधला निशाणा , म्हणाली - 'पापा की परी'चा चित्रपट ठरणार फ्लॉप

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाने आलियाला म्हटले 'पापा की परी'

अभिनेत्री कंगना रनोट हिने आलिया भट्टचा आगामी चित्रपट 'गंगूबाई काठियावाडी'वर निशाणा साधला आहे. कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आणि चित्रपटासाठी आलियाची निवड ही सर्वात मोठी चूक म्हटले आहे. इतकेच नाही तर 'पापा की परी'चा चित्रपट फ्लॉप ठरणार असेही कंगनाने म्हटले आहे. 'गंगुबाई काठियावाडी' हा चित्रपट येत्या शुक्रवारी (25 फेब्रुवारी) प्रदर्शित होतोय.

कंगनाने आलियाला म्हटले 'पापा की परी'
कंगनाने तिच्या सोशल मीडिया स्टोरीच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे करण जोहरला चित्रपट माफिया डॅडी आणि आलियाला बिम्बो म्हणून संबोधले, "या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा चुराडा होईल.... पापा (चित्रपट माफिया डॅडी) की परी (जिच्याकडे ब्रिटिश पासपोर्ट आहे) कारण पापा हे सिद्ध करू इच्छितात की रोमकॉम बिम्बो अभिनय करू शकते... चित्रपटातील सर्वात मोठी चुकीची गोष्ट म्हणजे त्याची कास्टिंग... आता त्यात सुधारणा होणार नाही, त्यामुळे चित्रपटगृहे आता फक्त दाक्षिणात्य आणि हॉलिवूड चित्रपटांकडे वळत आहेत. जोपर्यंत चित्रपट माफियांची सत्ता आहे तोपर्यंत बॉलिवूडच्या नशिबात हेच आहे," असे म्हणत कंगनाने आलिया भट्टवर निशाणा साधला आहे.

अप्रत्यक्षपणे संजय लीला भन्साळी आणि अजय देवगणवर कमेंट
आणखी एका पोस्टमध्ये कंगनाने संजय लीला भन्साळी आणि अजय देवगण यांचे करण जोहरने खच्चीकरण केल्याचेही कंगना म्हणाली आहे. कंगनाने लिहिले, "बॉलिवूड 'माफिया डॅडी पापा जो', ज्याने फिल्म इंडस्ट्रीची कार्यसंस्कृती उद्ध्वस्त केली, अनेक बड्या दिग्दर्शकांचे खच्चीकरण केले आणि त्याला हवे त्या कलाकारांना काम दिले. या रिलीजनंतर लवकरच आणखी एक उदाहरण समोर येईल... लोकांनी ते पाहणे बंद करायला हवे. या शुक्रवारी प्रदर्शित होणा-या चित्रपटाचा एक मोठा अभिनेता आणि एक उत्तम दिग्दर्शक याच्या खच्चीकरणाला बळी गेले आहेत."

कंगनाने व्हिडिओच्या माध्यमातूनही साधला होता निशाणा
कंगनाने अलीकडेच एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये एक छोटी मुलगी आलियाची नक्कल करताना दिसत आहे. यावर आक्षेप घेत कंगनाने लिहिले होते, 'ही लहान मुलगी तोंडात विडी घेऊन असे अश्लिल संवाद बोलतेय, तिने अशाप्रकारे एका सेक्स वर्करची नक्कल करणे योग्य आहे का? तिचे हावभाव पाहिलेत का? या वयात तिच्या चेहऱ्यावर अशाप्रकारचे हावभाव शोभा देतात का? या प्रकारे अशा बऱ्याच मुलांचा वापर केला जात आहे.’

बातम्या आणखी आहेत...