आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत प्रकरणात कंगनाचा नवा दावा:एम्सने आत्महत्येची शक्यता नाकारली, गळा आवळून खून होण्याची भीती केली व्यक्त; दीपिकाचे नाव न घेता म्हणाली  - कुठे आहे ही डिप्रेशन गँग?

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वृत्तानुसार एम्सच्या डॉक्टरांच्या पथकाने कूपर रुग्णालयाच्या डॉक्टरांची चौकशी केली.
  • सुशांत सिंह राजपूतच्या गळ्यावरील आडव्या लिगेचर मार्कसंदर्भात 4 प्रश्न विचारले गेले.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवरुन अभिनेत्री कंगना रनोट हिने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. तिने एक मीडिया रिपोर्ट शेअर करुन एम्सने सुशांतच्या आत्महत्येची शक्यता फेटाळून लावत त्याची गळा आवळून खून होण्याची भीती व्यक्त केली असल्याचा दावा केला आहे.

  • कंगनाने दीपिका पदुकोणवर साधला निशाणा

ट्विटमध्ये कंगनाने नाव न घेता दीपिका पदुकोणला लक्ष्य केले आहे. तिने लिहिले, "कुठे आहे ही डिप्रेशन गँग? जर डिप्रेशन मधुमेह किंवा कर्करोगासारखे असते, तर मग मधुमेह किंवा कर्करोगाच्या रुग्णाने आत्महत्या केली असे आपण का म्हणत नाही?", असा प्रश्न तिने विचारला आहे.

सुशांतच्या निधनानंतर, जेव्हा त्याने नैराश्येतून आत्महत्या केल्याचे म्हटले गेले होते, तेव्हा दीपिका पदुकोणने ट्विटरवर 'रिपीट आफ्टर मी' नावाची मोहीम चालवली होती. यात ती लोकांना नैराश्याविषयी जागरूक करत होती. तिने आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते, "नैराश्य हा कर्करोग आणि मधुमेहासारखा एक आजार आहे."

  • एम्सने कूपर रुग्णालयाच्या डॉक्टरांची चौकशी केली

इंडिया टुडेच्या एका वृत्तानुसार, सुशांतच्या मृत्यूच्या प्रकरणात पोस्टमॉर्टम रिपोर्ट समजून घेण्यासाठी सीबीआय एम्सची मदत घेत आहे. या संदर्भात, एम्सच्या तीन डॉक्टरांच्या चमूने 4 ते 6 सप्टेंबर दरम्यान कूपर रुग्णालयाच्या पाच डॉक्टरांची चौकशी केली.

14 जून रोजी सुशांतचा मृतदेह मुंबईतील त्याच्या फ्लॅटमध्ये सापडला होता. मृत्यूनंतरच्या छायाचित्रात त्याच्या गळ्यावर आडवा लिगेचर मार्क आढळला होता. असा लिगेचर मार्क सहसा आत्महत्येचा नसतो. सोशल मीडियावर सुशांतचा फोटो व्हायरल झाल्यानंतर गळ्यावरील लिगेचर मार्क बघून त्याची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला गेला. मात्र, पोस्टमार्टम अहवालात कूपर रुग्णालयाने आत्महत्या असल्याचे सांगितले होते.

  • एम्सने हे 4 प्रश्न कूपर रुग्णालयाच्या डॉक्टरांना विचारले

1. लिगेचर मार्कविषयी आपला दृष्टीकोन काय आहे?

2. लिगेचर मार्क बघता गळा आवळल्याची शक्यता आपण कशी नाकारली?

3. लिगेचर मटेरियल म्हणून जे सांगितले जात आहे, त्या कुर्त्याने अशी खूण कशी येऊ शकते?

4. गळा आवळल्याचे निराकरण कसे केले जाऊ शकते?

बातम्या आणखी आहेत...