आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले जगन्नाथ पुरीचे मंदिर हे जगभरात प्रख्यात आहे. येथे आज अभिनेत्री कंगना रनोट हिने भगवान श्रीकृष्ण, त्यांचे बंधू बलराम आणि बहीण सुभद्रा यांचे दर्शन घेतले. कंगना सध्या तिच्या आगामी 'धाकड' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र शूटिंगपासून ब्रेक घेत ती जगन्नाथ मंदिरात पोहोचली. येथील एक व्हिडिओ कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. यात तिच्या भोवती कडक सुरक्षा व्यवस्थेत दिसतेय.
कंगनाने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, "आपण श्रीकृष्णाला कायम राधा किंवा रुक्मणी सोबत पाहिले आहे. परंतु पुरी जगन्नाथमध्ये भगवान श्रीकृष्ण हे त्याचे बंधू बलराम आणि बहीण सुभद्रा (अर्जुनाची पत्नी, अभिमन्यूची आई) यांच्यासमवेत विराजमान आहेत. त्यांच्या हृदयातील चक्रातून निर्माण होणार्या उर्जामुळे संपूर्ण ठिकाणी निरोगी आणि सुखदायक भावना अनुभवायला मिळते."
डिसेंबरमध्ये व्यक्त केली होती जगन्नाथपुरीच्या दर्शनाची इच्छा
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कंगनाने जगन्नाथपुरीच्या दर्शनाची इच्छा व्यक्त केली होती. गुरुवारी सायंकाळी ती भुनेश्वर विमानतळावर पोहोचली. दर्शनानंतर मीडियासी बोलताना कंगना म्हणाली, वर्षाच्या सुरुवातीला महाप्रभूंचे दर्शन झाले. त्यामुळे यावर्षी सर्वकाही शूभ होईल, असे वाटत असल्याचे ती म्हणाली.
दिवाळीत प्रदर्शित होणार आहे 'धाकड'
कंगनाचा रजनीश घई दिग्दर्शित ‘धाकड’ हा चित्रपट यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर 1 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दिव्या दत्ता आणि अर्जुन रामपालसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात कंगना इंटेलिजेंस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे.
याशिवाय तिचा आणखी एक चित्रपट यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. थलायवी असे या चित्रपटाचे नाव असून यात तिने तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांची भूमिका वठवली आहे. 'धाकड' नंतर कंगना 'तेजस'च्या शुटिंगला सुरुवात करणार आहे. तिने 'अपराजित अयोध्या', 'मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ दिद्दा' आणि काश्मिरी पंडितांवरील अत्याचारांवर आधारित अद्याप शीर्षक न ठरलेल्या चित्रपटाची घोषणा केली आहे. याशिवाय आणखी एका आगामी चित्रपट कंगना इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.