आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रॅक्टर परेडवर कंगनाची प्रतिक्रिया:शेतकरी आंदोलनात झालेली हिंसा बघून भडकली कंगना, म्हणाली - माझी मान शरमेने खाली गेली, मला देशाची अखंडता वाचवता आली नाही'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाने या हिंसाचारावर भाष्य केले.

देशाची राजधानी दिल्ली येथे प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचारावर अभिनेत्री कंगना रनोट हिने भाष्य केले आहे. तिने शेतक-यांची तुलना दहशतवाद्यांसोबत केली. इतकेच नाही तर तिने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणा-या दिलजीत दोसांज आणि प्रियांका चोप्रा यांच्यावरही निशाणा साधला. सोबतच सरकारकडे नवीन कृषी कायदे लवकरात लवकर लागू करण्याची मागणी केली.

ट्रॅक्टर परेडची काही छायाचित्रे शेअर करुन एका नेटक-याने लिहिले की, 'जेव्हा कंगनाने शेतकरी आंदोलनावर प्रश्न उपस्थित केले होते, तेव्हा तिला ट्रोल करणारे बॉलिवूडचे क्रांतिकारी आता कुठे आहेत ? दिलजीत दोसांज कुठे आहे?'

त्याला उत्तर देताना कंगनाने लिहिले की, 'याकडे दुर्लक्ष करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न केला पण मी अपयशी ठरले.माझे अपयश खूप मोठे आहे. माझी मान शरमेने खाली गेली, असे मला वाटतेय. मी माझ्या देशाची अखंडता वाचवू शकले नाही. आज मी अपयशी ठरले आहे,' असे कंगना म्हणाली आहे.

दिलजीत दोसांजवर साधला निशाणा
यापूर्वी कंगनाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन लाल किल्ल्यावरील एका खांबावर चढून आपला ध्वज फडकावणाऱ्या शेतकरी आंदोलकाचा फोटो पोस्ट करत या पोस्टमध्ये प्रियांका चोप्रा आणि दिलजीत दोसांज यांना टॅग केले. यासह कंगना म्हणाली , 'तुम्ही याबाबत स्पष्टीकरण द्या. संपूर्ण जग आज आपल्यावर हसतंय. हेच हवं होत ना तुम्हा लोकांना?'

कंगनाची शेतकऱ्यांवर टीका
कंगनाने आपल्या एका पोस्टमध्ये म्हटले, 'स्वतःला जे शेतकरी म्हणून घेत आहेत अशा या दहशतवाद्यांना लोक प्रोत्साहन देत आहेत. हे खुलेआम होत असून सर्वांच्या समोर हा तमाशा सुरु आहे. जगात आज आपली खिल्ली उडवली जात असेल आपल्याला काहीही इज्जत राहिलेली नाही, आपण केव्हाही अडाण्यासारखे वागतो. दुसऱ्या देशाचे पंतप्रधान भारतात आले तरी आपण नग्न होऊन बसतो. यामुळे या देशाचं काहीही होणार नाही. जर सर्वकाही असंच सुरु राहिले तर कोणी देशाला दहा पावलं पुढे नेऊ पाहत असेल तर तो वीस पावलं मागे आणण्याचे काम केले जात आहे आणि आपण सर्वजण केवळ तमाशा पाहत आहोत.”

'जे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत, त्या सर्वांना तुरुंगात टाका. तसेच त्यांची सर्व प्रकारची संपत्ती जप्त केली जावी, अशी मागणी करताना हा देश, याचे सर्वोच्च न्यायालय, इथले सरकार हे सर्व थट्टा बनून राहिले आहे,” अशा शब्दांत कंगनाने या हिंसाचारावर भाष्य केले.