आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रह्मास्त्रची 70% कमाई खोटी:कंगना रनोटची प्रतिक्रिया, म्हणाली- वाह! चित्रपटाचे नवे आकडे फारच कमी आहेत

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रह्मास्त्रच्या बॉक्स ऑफिसच्या आकड्यांमध्ये प्रचंड हेराफेरी झाल्याच्या दाव्यावर कंगना रनोटने नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर फिल्ममेकर-लेखिका एरे मृदुला कॅथर यांचे ट्विट शेअर केले आणि लिहिले की, ब्रह्मास्त्र एका नवीन लोअर स्थितीत आहे. चित्रपटाचा सह-निर्माता करण जोहरने शनिवारी ट्विट केले होते की, ब्रह्मास्त्रचे जगभरात ओपनिंग कलेक्शन 75 कोटी रुपये आहे.

एरे मृदलाने सांगितली आकड्यांची हेराफेरी
चित्रपट निर्मात्या-लेखिका एरे मृदुला कॅथर यांनी एका ट्विटमध्ये ब्रह्मास्त्रच्या आकड्यांत हेराफेरी झाल्याचे म्हटले होते. त्यांनी लिहिले होते, "काही व्यापार विश्लेषक ब्रह्मास्त्र बॉक्स ऑफिसचे आकडे देत नाहीयेत, कारण त्यामध्ये पूर्णपणे हेराफेरी करण्यात आली आहे. जे लोक खोट्या बॉक्स ऑफिस आकड्यांसोबत विनोद करत आहेत, त्याम भरपूर पैसे दिले जातात. हे भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी हेराफेरी असू शकते. 60-70% आकडे खोटे आहेत."

मृदला यांच्या ट्विटवर कंगनाने प्रितिक्रिया दिली
कंगनाने हे ट्विट शेअर करत लिहिले की, 'वाह, 70 टक्के... ब्रह्मास्त्रसाठी हा नवा नीचांक आहे'. बॉक्स ऑफिस इंडिय डॉट कॉमनुसार, ब्रह्मास्त्रने भारतात 37 कोटींची कमाई केली आणि चित्रपटाने दोन दिवसांत 76 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.

अयानने 600 कोटी बरबाद केले : कंगना
ब्रह्मास्त्रला दिलेल्या नकारात्मक रिव्ह्यूचा स्क्रीनशॉट शेअर करत कंगनाने शनिवारी लिहिले होते, 'जेव्हा तुम्ही असत्य खपवण्याचा प्रयत्न करता.... करण जोहर लोकांना प्रत्येक शोमध्ये रणबीर-आलियाला सर्वोत्कृष्ट कलाकार आणि अयान मुखर्जीला जीनिअस म्हणायला भाग पाडतो. हळूहळू लोकांचा या असत्यावर विश्वास बसू लागला. करिअरमध्ये एकही चांगला चित्रपट न बनवणाऱ्या दिग्दर्शकाला करणने 600 कोटी दिले,' अशी टीका कंगनाने केली आहे.

केआरकेला तुरुंगात टाकले - कंगना
कंगनाने पुढे लिहिले, 'बेबी पीआरपासून लग्नापर्यंत मीडियावर नियंत्रण ठेवले, केआरकेला तुरुंगात टाकले, रिव्ह्यू विकत घेतले, तिकिटे विकत घेतली. ते सर्व बेईमानी करू शकतात पण एक चांगला प्रामाणिक चित्रपट बनवू शकत नाहीत,' असे ती म्हणाली. असेही लिहिले की, "जे अयान मुखर्जीला जीनियस म्हणतात त्यांना थेट तुरुंगात टाकले पाहिजे.

जगभरात 9 हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला हा चित्रपट
अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' 9 सप्टेंबर रोजी भारतात 5,019 स्क्रीन्सवर आणि परदेशात सुमारे 3,894 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. चित्रपटाचे वितरण हक्क स्टार स्टुडिओकडे आहेत. 21 फॉक्स स्टार स्टुडिओच्या शीर्षकातून फॉक्स काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे या स्टुडिओच्या नव्या नावाने प्रदर्शित होणारा 'ब्रह्मास्त्र' हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाचे जगभरात वॉल्ट डिस्ने स्टुडिओ मोशन पिक्चर फिल्म्सने वितरण केले आहे. हा चित्रपट भारतात 5,019 स्क्रीनसह जागतिक स्तरावर 8,913 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...