आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासैफ अली खानची प्रमुख भूमिका असलेल्या ‘तांडव’ या वेब सीरिजमधून हिंदूंच्या भावना दुखावल्यामुळे त्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. या चौफेक टीकेनंतर अखेर ‘तांडव’चे निर्माते अली अब्बास जफर यांनी माफी मागितली आहे. दरम्यान अभिनेत्री कंगना रनोट हिने सोशल मीडिया पोस्टद्वारे अली अब्बास जफर यांना एक सवाल विचारला आहे.
भाजपा नेते कपिल मिश्रा यांनी एक पोस्ट शेअर करत अली अब्बास जफरला उद्देशून म्हटले, ‘अली अब्बास जफर, कधी तुम्ही तुमच्या धर्मावर सिनेमा बनवला आणि त्यानंतर त्यासाठी माफी मागितली का? सगळ्या अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आमच्याच धर्माला का? कधी स्वतःच्या एकमेव देवाची थट्टा उडवून त्याबद्दलही माफी मागा. तुमच्या गुन्ह्यांचा हिशोब भारताचा कायदाच करेल. तो सीन तत्काळ मागे घ्या,' असे कपिल मिश्रांनी म्हटले.
कंगनाने कपिल मिश्रा यांचे ट्विट रिट्विट करत अली अब्बास जफरला एक संतप्त प्रश्न विचारला आहे. ती लिहिले, 'माफी मागण्यासाठी तो राहील तरी कसा? ते थेट गळाच कापतात. जिहादी देश फतवे काढतात. तुम्हाला फक्त जीवे मारले जात नाही तर ते करणे किती योग्य होते हेही सिद्ध केले जाते. सांग अली अब्बास जफर अल्लाहची थट्टा करण्याची हिंमत आहे का?' या आशयाची पोस्ट कंगनाने शेअर केली आहे.
अली यांनी माफीनाम्यात काय म्हटले?
अली यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे. त्यांनी लिहिले, 'ही वेब सीरिज पूर्णपणे फिक्शन आहे. या सीरिजमधील घटनेचा कोणत्याही जीवित व्यक्ती वा एखाद्या घटनेशी संबंध नाही. असलास तर तो योगायोग समजावा. कोणत्याही व्यक्ती, जाती, समुदाय आणि धार्मिक भावनांना ठेच पोहोचवण्याचा आमचा हेतू नाही. आम्ही सर्व तक्रारी समजून घेतल्या असून कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास आम्ही सर्वांची विना अट माफी मागत आहोत,' असे जफर यांनी म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
‘तांडव’ वेब सीरिजच्या पहिल्याच भागातील एका दृश्यामध्ये अभिनेता झिशान अयूब नाटकात काम करत आहे. त्याने भगवान शंकराची भूमिका साकारली आहे. दरम्यान तो नाटकामध्ये अपशब्द वापरताना दिसतो. या दृश्यामुळे हिंदुंच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप केला जात होता. तसेच हिंदू देवतांचा अपमान करण्यात आला असल्याचा आरोप काहींनी केले. मुंबईत या वेब सीरिज विरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर लखनौत अॅमेझॉन प्राइमच्या भारतातील प्रमुखांसह ‘तांडव’च्या निर्माता-दिग्दर्शक, लेखकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
निर्मात्यांच्या माफीनाम्याला अर्थ नाही
अली अब्बास जफर यांच्या माफीनाम्याला काहीच अर्थ नसल्याचे सोशल मीडिया यूजर्सनी म्हटले आहे. त्यांच्या माफीनाम्यावर आलेल्या प्रतिक्रियांनुसार त्यांची ही माफी एखाद्या मालिका किंवा चित्रपटाच्या सुरुवातीला येणा-या डिस्क्लेमरसारखी आहे. या माफीनाम्यात अली यांनी लिहिले की, ते प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
सोशल मीडिया यूजर्सच्या प्रतिक्रिया...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.