आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्रीकडून PM मोदींचे कौतुक:सलमान खानला मिळणाऱ्या धमक्यांबद्दल कंगना रनोट म्हणाली - 'घाबरायचे कारण नाही, कारण...'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता सलमान खानला गेल्या काही दिवसांपासून सतत धमक्या मिळत आहेत. यामुळे त्याच्या सुरक्षतेत वाढ करण्यात आली आहे. आता अभिनेत्री कंगना रनोट हिने अलीकडेच सलमान खानला मिळणाऱ्या धमक्यांबद्दल भाष्य केले आहे. सलमानला मिळालेल्या सुरक्षेवरुन तिने देशाच्या सुरक्षेबद्दल वक्तव्य केले आहे. या धमक्यांमुळे घाबरून जायची काहीही गरज नाही असे कंगना म्हणाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख करत देशाची सुरक्षा उत्तम लोकांच्या हातात असल्याचे ती म्हणाली आहे.

देशाची सुरक्षा उत्तम हातात, घाबरण्याचे कारण नाही - कंगना
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली, "आम्ही कलाकार आहोत. सलमान खानला केंद्राकडून सुरक्षा देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी ही सुरक्षा देऊ केली आहे, त्यामुळे घाबरायचे कारण नाही. जेव्हा मला धमक्या मिळाल्या होत्या तेव्हा मलाही सुरक्षा देण्यात आली होती. सध्या आपल्या देशाची सुरक्षा उत्तम लोकांच्या हातात आहे, त्यामुळे काहीही काळजी करायची आवश्यकता नाही," असे ती म्हणाली आहे.

हरिद्वारला दिली भेट, गंगा आरतीला लावली हजेरी
कंगनाने रविवारी हरिद्वारला भेट दिली आणि तिथे होणाऱ्या गंगा आरतीला हजेरीही लावली. येथून ती केदारनाथला रवाना होणार आहे.

UAE मध्ये सुरक्षेची गरज भासत नाही, पण भारतात थोडी अडचण येते
सलमान खानने नुकतीच आप की अदालत या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तो म्हणाले, "मी जिथे जातोय तिथे मला पूर्ण सुरक्षा दिली जात आहे. आता इथे दुबईत असताना त्याची काहीच गरज भासत नाही. इथे मी पूर्णपणे सुरक्षित आहे. भारतामध्ये थोडी समस्या आहे. शेवटी जे व्हायचे आहे ते होणारच आहे. माझ्या आजूबाजूला असलेली शस्त्रधारी माणसं पाहून मला आता थोडी भीती वाटायला लागली आहे."