आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Kangana Ranaut Writes In Her Twit, Shoot These Rapists Publicly, What Is The Solution To These Gang Rapes That Are Growing In Numbers Every Year? What A Sad And Shameful Day For This Country.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाजिरवाणी घटना:यूपीत दलित तरुणीसोबत झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेवर कंगना रनोटचा संताप, म्हणाली - या बलात्कार करणा-यांना जाहीरपणे गोळ्या घाला

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उत्तर प्रदेशातील हाथरस येथील गँगरेप पीडित दलित तरुणीचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
  • 14 सप्टेंबर रोजी तिच्यावर चार जणांनी बलात्कार केला होता.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार पीडित 19 वर्षीय दलित तरुणीचा दोन आठवड्यानंतर आज उपचारांदरम्यान मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. तिच्या निधनानंतर देशभरात प्रचंड संताप दिसून येत आहे. अभिनेत्री कंगना रनोट हिने देखील ट्विटरच्या माध्यमातून या प्रकरणावर आपला रोष व्यक्त केला आहे. दोषींना जाहीरपणे गोळ्या घालण्याची मागणी कंगनाने केली आहे.

आपल्या ट्विटमध्ये कंगनाने लिहिले, 'या बलात्कार करणार्‍यांना जाहीरपणे गोळ्या घाला. या दुष्कर्मांचे निराकरण काय आहे, ज्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे? या देशासाठी किती वाईट आणि लज्जास्पद दिवस आहे. आम्हाला लाज वाटते कारण आम्ही आमच्या मुलींचे रक्षण करण्यात अयशस्वी ठरलो आहोत. #RIPManishaValmiki', अशा शब्दांत कंगनाने आपला संताप व्यक्त केला आहे.

  • पीडितेची झुंज संपली

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे 14 सप्टेंबर रोजी पीडितेवर चार सवर्ण तरुणांनी बलात्कार केला होता. दोन आठवड्यानंतर आज उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. दिल्लीतील निर्भया प्रकरणासारखे हे प्रकरण आहे. बलात्कारानंतर या दलित तरुणीची जीभ छाटून तिची मान मोडण्यात आल्याचा अमानुष प्रकार घडला आहे. यामुळे नाजूक स्थिती असलेल्या या तरुणीची गेल्या 14 सप्टेंबरपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर आज तिची प्राणज्योत मालवली.

  • 14 सप्टेंबर रोजी काय घडले होते?

तरुणीच्या मृत्यूपूर्वी तिच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, 14 सप्टेंबर रोजी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी ही तरुणी आपल्या शेतात गेली होती. याठिकाणी सवर्ण समाजातील चार तरुणांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ अवस्थेत जेव्हा ही तरुणी घटनास्थळी आढळून आली तेव्हा तिची जीभ छाटलेली होती तसेच तिच्या मानेवर गंभीर जखमा होत्या. त्याचबरोबर तिच्या पाठीच्या कण्यालाही गंभीर दुखापत झाली होती.

  • ट्विटरवर ट्रेडिंगमध्ये #RIPManishaValmiki

या घटनेचा विरोधात सोशल मीडियावर लोकांचा रोष दिसून येतोय. मंगळवारी सकाळपासून ट्विटरवर या घटनेचा निषेध करण्यासाठी #RIPManishaValmiki, CBI4HathrasGangRape, #JusticeForManishaValmiki हे हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहेत.

बातम्या आणखी आहेत...