आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतल्या त्रुटीवर संतापली कंगना:अभिनेत्री कंगना रनोट म्हणाली - ही घटना लज्जास्पद, पंजाब दहशतवादी कारवायांचे केंद्र बनत आहे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधानांवर हल्ला हा प्रत्येक भारतीयावर हल्ला आहे: कंगना

बुधवारी पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा आंदोलकांनी रोखल्याच्या घटनेनंतर अभिनेत्री कंगना रनोटची प्रतिक्रिया समोर आली आहे. कंगनाने गुरुवारी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून पीएम मोदींच्या सुरक्षेच्या त्रुटींवर प्रतिक्रिया देत या घटनेला 'लज्जास्पद' आणि 'लोकशाहीवरील हल्ला' म्हटले आहे. पंजाब हे दहशतवादी कारवायांचे केंद्र बनत असल्याचेही ती म्हणाली आहे.

पंतप्रधानांवर हल्ला हा प्रत्येक भारतीयावर हल्ला आहे: कंगना
आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये कंगनाने याबद्दल भाष्य केले आहे. ती म्हणाली, पंजाबमध्ये जे घडले ते लज्जास्पद आहे. आदरणीय पंतप्रधान हे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले नेते, प्रतिनिधी आणि 140 कोटी जनतेचा आवाज आहेत. त्यांच्यावर असा हल्ला म्हणजे देशातल्या प्रत्येक नागरिकावर हल्ला आहे, आपल्या लोकशाहीवरचा हल्ला आहे. पंजाब हे दहशतवादी कारवायांचे केंद्र बनत आहे. आता आपण हे थांबवले नाही तर देशाचे मोठं नुकसान होऊ शकते.' यासोबतच कंगनाने #BharatStandWithModiji असेही लिहिले आहे.

पंतप्रधानांचा ताफा 20 मिनिटे थांबला
2022 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रॅली 5 जानेवारी (बुधवार) रोजी फिरोजपूरमध्ये ठेवण्यात आली होती. ही रॅली पंजाबमधील भाजपच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात करणार होती. यासोबतच पंतप्रधान मोदींना कोट्यवधींच्या प्रकल्पाची पायाभरणीही करायची होती. पण, शेतकऱ्यांनी पंतप्रधानांना विरोध करत रास्ता रोको केला. भाजप कार्यकर्त्यांनाही रॅलीच्या ठिकाणी पोहोचू दिले नाही. ़

‘सुरक्षेत गंभीर चुकी’मुळे मोदी 15 ते 20 मिनिटे एका फ्लायओव्हरवर अडकले. आंदोलकांनी ट्रक-ट्रॅक्टर लावून रस्ता रोखला. यामुळे सभा न घेताच पंतप्रधानांना परतावे लागले. गृह मंंत्रालयानुसार, पंतप्रधानांचे विमान सकाळी भटिंडाच्या भिसियाना विमानतळावर उतरले होते. ते दुपारी 12 वाजता हेलिकॉप्टरने फिरोजपूरच्या हुसेनीवालास्थित राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देणार होते. वाईट हवामानामुळे 20 मिनिटे वाट पाहिल्यानंतर ताफा सुमारे 100 किमी लांब रोडने रवाना झाला. यासाठी पंजाबच्या डीजीपींनी मार्ग ‘क्लिअर’ असल्याची पुष्टी केली. यानंतर पंतप्रधानांचा ताफा दुपारी 1:40 वाजता सभास्थळाच्या 11 किमी आधी प्यारेआना गावापर्यंत पोहाेचला. तेथे फ्लायओव्हरवर 200 पेक्षा जास्त शेतकरी निदर्शने करत होते. यामुळे ताफा 15 ते 20 मिनिटे खोळंबला. यामुळे सर्व कार्यक्रम रद्द करून मोदी भटिंडा एअरपोर्ट व नंतर दिल्लीला परतले. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही मोठी चूक होती. यासाठी केंद्र सरकार आणि भाजपने पंजाबच्या काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...