आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरल व्हिडिओ:तापसी पन्नूने कंगनाला म्हटले थँक्यू, उत्तर देताना कंगना रनोट म्हणाली -  विमल फिल्मफेअर अवॉर्डसाठी तूच पात्र आहेस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगना आणि तापसी यांच्यात सोशल मीडियावर कायम तू तू मैं मैं बघायला मिळत असते.

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिला अलीकडेच 'थप्पड' या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर तापसीने मंचावर आपल्या भावना व्यक्त केल्या. यवेळी तिने अनेकांचे आभार मानले, यात तापसीने दीपिका पदुकोण, जान्हवी कपूर, विद्या बालन यांच्यासह कंगना रनोट हिचे देखील आभार मानले. कारण या सर्व अभिनेत्रींना या पुरस्कारासाठी नॉमिनेशन मिळाले होते. तापसीचा आभारप्रदर्शनाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बघून कंगनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तापसीला आपल्या स्टाइलमध्ये उत्तर दिले आहे.

विमल फिल्मफेअर अवॉर्डसाठी तूच पात्र आहेस
'आम्हाला सगळ्यांना आणखी मेहनत करायला भाग पाडण्यासाठी कंगना तुझे आभार. तुझ्या अभिनयाची उंची दिवसेंदिवस अशीच वाढत राहो,' असे तापसी त्या व्हिडिओमध्ये म्हणाली. तापसीने कौतुक केल्यानंतर कंगनाने तिला उत्तर दिले आहे. तापसीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर कंगना रनोटने म्हटले, “धन्यवाद तापसी, तू विमल फिल्मफेअर अवॉर्डसाठी पात्र आहेस. यावर तुझ्या इतका दुसऱ्या कोणाचा हक्क नाही.' सोशल मीडियावर यूजर्स मात्र कंगनाच्या या उत्तराचा वेगवेगळा अर्थ लावत आहेत. काहींच्या मते कंगनाने आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला, तर काहींच्या मते, कंगनाने गोड शब्दांत तापसीवर निशाणा साधला आहे. कंगना आणि तापसी यांच्यात सोशल मीडियावर कायम तू तू मैं मैं बघायला मिळत असते.

कंगनाच्या 'थलायवी'चे प्रदर्शन पुढे ढकलले

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, कंगना रनोटचा 'थलायवी' हा चित्रपट येत्या 23 एप्रिल रोजी रिलीज होणार होता. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्मात्यांनी अनिश्चित काळासाठी त्याचे प्रदर्शन पुढे ढकलले आहे. निर्मात्यांच्या मते, सद्यस्थिती बघता चित्रपट प्रदर्शित करणे तोट्याचे ठरु शकते. दुसरीकडे तापसी तिच्या आगामी ‘शाब्बास मिट्टू’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजच्या संघर्षावर आधारीत आहे.

बातम्या आणखी आहेत...