आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेस नेत्यावर भडकली कंगना रनोट:गृहिणींना पगार देण्याचे शशी थरुर यांनी केले स्वागत, कंगना म्हणाली - प्रत्येक गोष्टीकडे व्यवसाय म्हणून बघणे बंद करा

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गृहिणी महिलांना पगार देण्याबद्दल अभिनेते कमल हासन यांनी विचार मांडला आहे.

कंगना रनोट हिने काँग्रेस नेते आणि तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरुर यांच्यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. गृहिणी महिलांना पगार देण्याबद्दल अभिनेते कमल हासन यांनी विचार मांडला आहे. त्याचे शशी थरूर यांनी स्वागत केले आहे. यावरुन नाराजी व्यक्त करताना कंगनाने सोशल मीडियावर लिहिले, “आमच्या लैंगिकतेची किंमतीत मोजू नका. आम्हाला आमच्या लोकांची काळजी घेण्यासाठी पैसे देऊ नका. महिलांना आपल्या छोट्या घर रूपी साम्राज्याची मालकीण बनण्यासाठी पगाराची गरज नाही. आम्हाला मातृत्वासाठी पैसे देऊ नका. प्रत्येक गोष्टीकडे व्यवसाय म्हणून बघणे बंद करा. आपल्या घरातील महिलांसमोर स्वतःला समर्पित करा. त्यांना तुमची गरज आहे, फक्त तुमच्या प्रेमाची, सन्मानाची.. पगाराची नाही,” असे म्हणत कंगनाने शशी थरूर यांना उत्तर दिले आहे.

शशी थरुर यांनी काय लिहिले होते?
शशी थरुर यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते, 'गृहिणींना वेतन देण्याच्या कमल हासन यांच्या कल्पनेचे मी स्वागत करतो. राज्य सरकारने गृहिणींना मासिक वेतन देणे हे गृहिणींच्या कामाला समाजात ओळख निर्माण करून देईल, त्याचबरोबर त्यांना आर्थिक बळही देईल. गृहिणींची सेवा त्यांची शक्ती आणि स्वायतत्ता वाढवेल आणि सार्वत्रिकपणे मूलभूत वेतन तयार करेल,' असे मत शशी थरुर यांनी व्यक्त केले होते.

निवडणूक प्रचारादरम्यान कमल हासन यांनी केले होते वक्तव्य
मक्कल नीधी मैयम (एमएनएम) चे अध्यक्ष आणि अभिनेते कमल हासन यांनी सोमवारी निवडणूक प्रचारादरम्यान अन्नाद्रमूक आणि द्रमूक या राजकीय पक्षांवर निशाणा साधला होता. त्यांनी तामिळनाडूतील महिलांची सुरक्षेवरून प्रश्न उपस्थित केला होता. गृहिणी महिलांचे काम व्यवसाय समजण्यात यावे आणि त्यासाठी त्यांना वेतनही दिले जावे अशी भूमिका कमल हासन यांनी मांडली आहे. तामिळनाडूत येत्या एप्रिल-मे मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...