आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगनाचा आगामी चित्रपट:कंगना रनोटच्या 'तेजस'मधील भूमिकेचा झाला खुलासा, वायुसेना अधिकारी तेजस गिलची भूमिका वठवणार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगना म्हणते - वायुसेनेच्या वर्दीवर हे नाव दिसल्याने छान वाटत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट मार्च महिन्यापासून तिच्या आगामी ‘तेजस’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी तिने तिच्या व्यक्तिरेखेबद्दल खुलासा केला आहे. या चित्रपटात ती शिख वायुसेना अधिकारी तेजस गिलच्या भूमिकेत झळकणार आहे.

कंगनाने सोशल मीडियावर आपल्या भूमिकेविषयी खुलासा करताना लिहिले, 'तेजसमध्ये एका शिख सोल्जरची भूमिका साकारत आहे. यापूर्वी म्हणजे जोपर्यंत मी वर्दीवरील पूर्ण नाव वाचले नव्हते, तोपर्यंत मला याविषयी काहीही माहित नव्हते,' असे कंगनाने म्हटले आहे. वायुसेनेच्या वर्दीवर हे नाव दिसल्याने छान वाटत आहे, असेही ती म्हणाली आहे. हा चित्रपट सर्वेश मेवाडा दिग्दर्शित करत असून अद्याप चित्रपटाची रिलीज डेट जाहिर करण्यात आलेली नाही.

कंगनाचे अपकमिंग प्रोजेक्ट्स
‘तेजस’ चित्रपटासोबतच कंगना तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या बायोपिक ‘थलाइवी’मध्ये दिसणार आहे. ए.एल. विजय दिग्दर्शित हा चित्रपट 23 एप्रिल 2021 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. कंगना अलीकडेच तिच्या आगामी ‘धाकड’ चित्रपटाचे भोपाळमधील शूटिंग पूर्ण केले आहे. कंगनाने याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. कंगनाने एक ट्विट करत म्हटले होते, 'शेड्यूल रॅप अलर्ट …. माझ्या आयुष्यातील सर्वात चांगली टीम… सोहेलचे आभार'

याशिवाय कंगनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून 2018 मध्ये रिलीज झालेला ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’चा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आणत असल्याची काही दिवसांपूर्वीच घोषणा केली. तिच्या या आगामी चित्रपटाचे नाव ‘मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ दिद्दा’ असेल. या चित्रपटाची निर्मितीदेखील ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’चे निर्माते कमल जैन करणार आहेत. या चित्रपटासंदर्भात कंगना म्हणते, तिच्या उर्वरित चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतरच मी ‘मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ दिद्दा’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल. सूत्रानुसार, कंगना या चित्रपटाचे शूटिंग जानेवारी 2022 मध्ये सुरू करणार आहे. कंगना आणि कमल जैनने चित्रपटाची फायनल स्क्रिप्ट तयार केली आहे. हा चित्रपट मागील चित्रपटापेक्षा भव्य आणि मोठ्या बजेटचा असेल. याशिवाय कंगना आणखी एका आगामी चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका वठवणार आहे.

बातम्या आणखी आहेत...