आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री कंगना रनोट हिने मंगळवारी आपल्या आगामी तेजस या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. बुधवारी कंगनाने सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट शेअर करत 'तेजस'चे लेखक-दिग्दर्शक सर्वेश मेवाडा यांच्या संघर्षाविषयी सांगितले. या पोस्टसह कंगनाने दिग्दर्शकाच्या कुटूंबासोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. सर्वेश मेवाडा 'तेजस' चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत.
सर्वेश यांनी एका दशकाहून अधिक काळ स्ट्रगल केले
कंगनाने ही पोस्ट शेअर करताना लिहिले आहे, 'तेजस'चे लेखक-दिग्दर्शक सर्वेश मेवाडा यांनी पहिला ब्रेक मिळवण्यासाठी एका दशकाहून अधिक काळ संघर्ष केला आहे. काल शूटिंगच्या पहिल्या दिवशी त्यांच्या आई खूप भावूक झाल्या होत्या. त्यांनी मला माझ्या कुटुंबाची आठवण करुन दिली. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आउटसाइडर्सना काम करणे सोपे नाही. आम्हाला सर्वेश मेवाडा तुमचा अभिमान वाटतो," अशा आशयाची पोस्ट कंगनाने शेअर केली आहे.
23 एप्रिलला कंगनाचा 'थलायवी' रिलीज होणार आहे
‘तेजस’ चित्रपटासोबतच कंगना तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या बायोपिक ‘थलाइवी’मध्ये दिसणार आहे. ए.एल. विजय दिग्दर्शित हा चित्रपट 23 एप्रिल 2021 रोजी चित्रपटगृहात
प्रदर्शित होईल. कंगना अलीकडेच तिच्या आगामी ‘धाकड’ चित्रपटाचे भोपाळमधील शूटिंग पूर्ण केले आहे. कंगनाने याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. कंगनाने एक ट्विट करत म्हटले होते, 'शेड्यूल रॅप अलर्ट …. माझ्या आयुष्यातील सर्वात चांगली टीम… सोहेलचे आभार'
याशिवाय कंगनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून 2018 मध्ये रिलीज झालेला ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’चा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आणत असल्याची काही दिवसांपूर्वीच घोषणा केली. तिच्या या आगामी चित्रपटाचे नाव ‘मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ दिद्दा’ असेल. या चित्रपटाची निर्मितीदेखील ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’चे निर्माते कमल जैन करणार आहेत.
या चित्रपटासंदर्भात कंगना म्हणते, तिच्या उर्वरित चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतरच मी ‘मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ दिद्दा’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल. सूत्रानुसार, कंगना या चित्रपटाचे शूटिंग जानेवारी 2022 मध्ये सुरू करणार आहे. कंगना आणि कमल जैनने चित्रपटाची फायनल स्क्रिप्ट तयार केली आहे. हा चित्रपट मागील चित्रपटापेक्षा भव्य आणि मोठ्या बजेटचा असेल. याशिवाय कंगना आणखी एका आगामी चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका वठवणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.