आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट हिच्या मुंबईतील पालीहिलस्थित ऑफिसवर मुंबई महापालिकेचा हातोडा पडला आहे. ऑफिसचे बांधकाम अवैध असल्याचे सांगत बीएमसीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. सोमवारी मुंबई महापालिकेने कंगनाला बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस बजावली होती. 354 अ अंतर्गंत ही नोटीस तिला देण्यात आली होती. इमारतीचे बांधकाम पालिकेच्या नियमांनुसार झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे याचवर्षी जानेवारी महिन्यात कंगना आपले स्वप्न साकार केले होते. ऑफिस स्पेस कम स्टुडिओचा असलेल्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव कंगनाने मणिकर्णिका फिल्म्स असे ठेवले आहे. तब्बल 48 कोटी रुपये तिने यासाठी खर्च केले. पण आता बीएसीचा हातोडा पडल्यानंतर कंगनाचे स्वप्न धुळीस मिळाल्याचे दिसत आहे. एक नजर टाकुया कंगनाच्या ऑफिसवर...
कंगनाने काही महिन्यांपूर्वी एल मॅगझिनसाठी या ऑफिसचे इनसाइड फोटोशूट केले होते.
काही महिन्यांपूर्वीच या मासिकाच्या एका फीचरमध्ये कंगनाने खुलासा केला होता की, तिने अशा जागेचे स्वप्न पाहिले होते, जे बघून 1920 च्या काळाचा अनुभव मिळेल. जिथे बर्याच गोष्टी हातांनी बनविल्या जात असत.
कंगनाने आपले हे ऑफिस यूरोपियन स्टाइलमध्ये सजवले होते.
कंगनाच्या प्रॉडक्शन हाउसमध्ये वापरण्यात आलेले फर्निचर हे हँडमेड आहे.
पाली हिलमधील बंगला नंबर 5 मध्ये असलेल्या कंगनाच्या या ऑफिसचे डिझाइन हे डिझायनर शबनम गुप्ता यांनी तयार केले होते.
कंगनाचे हे ऑफिस फक्त प्लास्टिक फ्री नाही तर इको फ्रेंडली आहे.
बातम्यांनुसार, कंगनाने ही तीन मजली इमारत काही वर्षांपूर्वी खरेदी केली होती. यामध्ये 565 चौ. फूटांचा पार्किंग एरिया वेगळा आहे. ऑफिसचे इंटेरियर शबनम गुप्ता यांनी डिझाइन केले. त्यांच्या मते, बिल्डिंगच्या प्रत्येक खिडकीतून हिरवळ नजरेत पडले. सोबतच अशा प्रकारे इंटेरियर करण्यात आले आहे, जेणेकरुन अधिकाधिक प्रकाश आणि हवा येत राहील.
कंगनाची बहीण रंगोली चंदेलने याचवर्षी जानेवारी महिन्यात आपल्या ट्विटर हँडलवर स्टुडिओचा फ्रंट लूक रिव्हील केला होता. कॅप्शनमध्ये तिने लिहिले होते, "कंगनाचा हा स्टुडिओ मुंबईतील प्राइम लोकेशन पाली हिल येथे आहे. 10 वर्षांपूर्वी तिने हे स्वप्न पाहिले होते आणि आज आम्ही देखील ते पाहिले आहे."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.