आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगना पुन्हा बरळली:आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भडकली कंगना, म्हणाली - मला नमक हराम काय म्हणता, तुम्ही केवळ सरकारी नोकर आहात

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रविवारी दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई आणि महाराष्ट्रचं मीठ खायचं आणि नमक हरामी करायची.
  • नामोल्लेख टाळत उद्धव ठाकरे म्हणाले- ज्यांना आपल्या राज्यात खायला मिळत नाही ते येथे येतात.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अभिनेत्री कंगना रनोट यांच्यातील शाब्दिक चकमक अद्यापही सुरूच आहे. रविवारी उद्धव ठाकरे यांनी आपल्या दसर्‍या मेळाव्याच्या भाषणात कंगनाचा नामोल्लेख टाळत तुम्ही येथे रोजगारासाठी येता आणि मुंबईला बदनाम करता, ज्यांना त्यांच्या राज्यात खायला मिळत नाही, ते येथे येतात, असे म्हणत तिच्यावर प्रहार केला होता. आता कंगनाने त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे लाज बाळगा, तुम्ही या पदासाठी लायक नाहीत, असे म्हणत तिने त्यांच्यावर पलटवार केला आहे.

  • 'उद्धव यांनी मला शिवीगाळ केली, सोनिया सेनेनेही तेच केले'

कंगनाने ट्विटरवर 2 मिनिटांचा व्हिडिओ शेअर केला आहे. ती म्हणाली, "उद्धव ठाकरे, काल तुम्ही तुमच्या भाषणात मला शिवीगाळ केली, मला नमक हराम म्हटले. यापूर्वीही सोनिया सेनेच्या अनेक लोकांनी मला शिवीगाळ केली, मला धमकावले. मला मारहाण करणार असल्याचे म्हटले, हरामखोर म्हटले, अनेक प्रकारच्या शिव्या यापूर्वीच सोनिया सेनेने मला दिल्या आहेत. परंतु, जे महिला सक्षमीकरणाचे ठेकेदार आहेत, त्यांनी यावर आक्षेप घेतला नाही', असे कंगना म्हणाली.

  • 'तुम्ही भारताची तुलना पाकिस्तानशी केली'

कंगना पुढे म्हणाली- 'मुख्यमंत्री, मला धमकावण्यात आल्यानंतर जेव्हा मी मुंबईची तुलना पीओकेशी केली होती, तेव्हा तुम्ही माझ्यावर खूप रागावले होते. तुमच्या सोनिया सेनेने त्यांचा बचाव केला होता . त्यामुळे मी पीओकेशी तुलना केली होती. तेव्हा राज्यघटना वाचवा म्हणणारे लगेच समोर आले होते. काल तुम्ही आपल्या भाषणात भारताची तुलना पाकिस्तानशी केली, आता ते लोक येणार नाहीत, कारण त्यांना कुणीतरी पैसे पुरवत आहेत', असा आरोपदेखील कंगनाने केला.

  • 'राज्यघटना वाचवा म्हणणारे आता काही बोलणार नाहीत'

कंगना पुढे म्हणाली, 'जे देशभक्त आहेत, त्यांच्या मदतीला कधी कुणी पुढे येत नाहीत. जर तुम्ही देशभक्तीबद्दल बोलत असाल, देशासाठी काही करत असाल, तर आमच्यावर तो उपकार आहे का? तुम्ही स्वतःसाठी ते म्हणत आहात. ते म्हणतात की आमच्याकडे पैसे नाहीत, आणि आम्हाला कुणी देत नाहीत आणि आम्ही स्वतःही ते घेत नाही. पण, देशातील विद्रोहासाठी तुमच्या तोंडात पैसे टाकले जातात. जेव्हा एक मुख्यमंत्री असलेल्या उघडपणे एका मुलीला शिवीगाळ करतो, तेव्हा राज्यघटना वाचवा म्हणणारे आता काही बोलणार नाहीत', असे कंगना म्हणाली.

  • 'तुम्ही जे बोलला त्यावरुन तुम्ही एखाद्या स्त्रीशी कसे वागता ते दिसून येते'

कंगनाने ट्विट केले की, 'राऊत यांनी मला हरामखोर म्हटले, उद्धव यांनी नमक हराम म्हटले. त्यांचा दावा आहे की, जर मला मुंबईत आसरा मिळाला नसता तर माझ्या राज्यात मला खायलाही मिळाले नसते. लाज वाटू द्या, मी तुमच्या मुलाच्या वयाची आहे. तुमच्या बोलण्यावरून एका सेल्फ मेड सिंगल वूमनसोबत कसे वागता, हे दिसून येते. मुख्यमंत्री तुम्ही नेपोटिज्म (घराणेशाही) चे सर्वात वाइट प्रॉडक्ट आहात', अशी घणाघाती टीका कंगनाने उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

  • 'तुमचे घाणेरडे भाषण म्हणजे तुमच्या अक्षम्यतेचे वाईट प्रदर्शन'

कंगनाने आपल्या ट्विटमध्ये पुढे लिहिले, 'हिमालयाच्या सौंदर्याचे जसे प्रत्येक भारतीयासोबत नाते आहे, तसेच मुंबईत मिळणा-या संधी या प्रत्येकासाठी आहेत. दोन्ही माझी घरं आहेत. उद्धव ठाकरे आमचे लोकशाही हक्क काढून घेऊन आमचे विभाजन करण्याची हिंमत तुम्ही करू शकत नाही. तुमचे घाणेरडे भाषण हे तुमच्या अक्षम्यतेचे वाईट प्रदर्शन आहे', असे मत कंगनाने व्यक्त केले.

  • 'मुख्यमंत्री देशाचे विभाजन करत आहेत'

कंगनाने आपल्या आणखी एका ट्विटमध्ये म्हटले की, 'मुख्यमंत्र्यांचे धाडस बघा, ज्या देशाने त्यांना महाराष्ट्राचा ठेकेदार बनवले, त्याच देशाचे विभाजन ते करु पाहात आहेत. ते फक्त सरकारी नोकर आहेत. त्यांच्यापूर्वी कुणी दुसरा होता आणि त्यांच्यानंतर आणखी कुणी येईल. मग ते महाराष्ट्र त्यांच्या एकट्याचा असल्यासारखे का वागत आहेत?', असा प्रश्न तिने विचारला आहे.