आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवा वाद:कंगना म्हणाली : रणवीरसिंह, रणबीर कपूर ड्रग्ज घेतात, अशा अफवा आहेत

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रक्ताची चाचणी करून या अफवा खोट्याच असल्याचे सिद्ध करा - कंगनाचे ट्वीट

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर बॉलीवूडच्या ड्रग्ज कनेक्शनमधील आणखी काही बाबी समोर येत आहेत.

अभिनेत्री कंगना राणावतच्या ट्वीटमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. त्यात तिने लिहिलेय- ‘मी रणवीर सिंह, रणबीर कपूर, अयान मुखर्जी आणि विक्की कौशल यांना आवाहन करते की, त्यांनी रक्ताचे नमुने देऊन आपली ड्रग्ज चाचणी करून घ्यावी. या सर्वांना कोकेनचे व्यसन असल्याची अफवा आहे. हे सर्वजण लोकांसाठी रोल मॉडेल आहेत. त्यांची चाचणी निगेटिव्ह आली तर ते अनेकांना प्रेरणा देऊ शकतात.’

कंगना राणावतने आपल्या ट्वीटमध्ये पंतप्रधान कार्यालयालाही टॅग केले आहे. त्याआधी तिने ट्वीटमध्ये म्हटले होते की, ‘९९ टक्के सुपरस्टार ड्रग्ज घेतात आणि मी त्याची गॅरंटी घेते. बॉलीवूडच्या पार्ट्यांत ड्रग्जचा वापर खुलेआम होतो.’

खेळाडूंची डोपिंग टेस्ट, मग अभिनेत्यांची ड्रग्ज टेस्ट का नाही?

डोपिंग टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आल्यावर ‘वाडा’ जशी खेळाडूंवर बंदी घालते त्याचप्रमाणे चित्रपट सेन्सॉर मंडळालाही नवे धोरण तयार करावे लागेल. अभिनेत्यांच्या ड्रग्ज टेस्टनंतरच चित्रपट प्रदर्शनाचे प्रमाणपत्र का जारी होऊ नये?