आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासलमान खानचा आगामी चित्रपट 'राधे : योर मोस्ट वांटेड भाई' चा टीजर मार्चमध्ये रिलीज केला जाणार आहे. रिपोर्टमध्ये दावा केल जात आहे की, हा व्हिडिओ एक मिनिटांपेक्षा कमी वेळेचा असणार आहे. मात्र हे पाहून चित्रपटातील अॅक्शनचा अंदाज लावला जाऊ शकेल. तसेच अक्षय कुमार स्टारर ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाशी अटॅच केला गेल्याचीही चर्चा आहे. यासोबतच दावा केला जात आहे की, टीजर आल्याच्या काही दिवसांनंतरच मेकर्स ईदला रिलीज होणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज करतील.
2. कंगनाने मेरिल स्ट्रीप, गल गडोटसोबत केली स्वतःची तुलना, सोशल मीडियावर झाली ट्रोल
कंगना रनोटने सोशल मीडियावर स्वतःचा चित्रपट 'थलाइवी' आणि 'धाकड़' चा बिहाइंड द सीन फोटो शेअर केला आहे. ज्या माध्यमातून तिने स्वतःच्या ट्रान्सफॉर्मेशनवर भाष्य केले. कंगनानुसार, एक परफॉर्मर म्हणून ती जसे परफॉर्म करते, तसे जगात कोणतीही दुसरी अभिनेत्री करु शकत नाही. अभिनेत्रीने स्वतःची तुलना हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मेरिल स्ट्रीप आणि गल गडोटसोबत केली आहे. ज्यावरुन तिला प्रचंड ट्रोल केले जात आहे. अनेक सोशल मीडिया यूजर्स तिच्या पोस्टवर कमेंट करत लिहित आहेत की, 'असे वाटतेय तिला डॉक्टरांची गरज आहे' तर काही यूजर्सने लिहिले आहे की, मेरिल स्ट्रीपने कंगनाचे ट्विट पाहिले तर ती हिच्या विरोधात मानहानीची केस दाखल करेल.
3. असे जग पाहायचे आहे, जिथे कुणीचाही मानसिक आजाराने मृत्यू होणार नाही : दीपिका पादुकोण
दीपिका पादुकोण म्हणाली की, असे जग पहायचे आहे की जिथे कुणीही मानसिक आजाराने मरणार नाही आणि यासाठी तिची 'द लाइव्ह लव्ह लाइफ' फाउंडेशन पूर्णपणे बांधील आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर 'द लव्ह लव्ह लाइफ' चा एक फोटो शेअर करत लिहिले आहे की गेल्या 5 वर्षांमध्ये द लिव्ह लव लाइफ फाउंडेशनच्या प्रवासामध्ये देणगीदार, भागीदार, सरकारी अधिकारी आणि त्यांच्या अविश्वसनीय टीमने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. परंतु ज्या लोकांना मानसिक आजार अनुभवले आहेत त्यांचा प्रभाव सर्वात जास्त राहिला.
4. टायगरची 'गणपत' मधील लीड अॅक्ट्रेसचा फर्स्ट लूक आउट, अॅक्टरने शेअर केला टीजर
टायगर श्रॉफचा आगामी अॅक्शन थ्रिलर 'गणपत' च्या लीड अॅक्ट्रेसची पहिली झलक समोर आली आहे. स्वतः टायगरने मंगळवारी अभिनेत्रीसंबंधीत टीजर शेअर केला आहे. त्याने लिहिले की, 'सुना है मुड़ने वाली है कल 10:40 बजे।' टीजरमध्ये अभिनेत्रीचा चेहरा दिसत नाहीये. मात्र ही कृती सेनन असल्याचा अंदाज आहे. गेल्यावर्षी लॉकडाऊनदरम्यान टायगरच्या या चित्रपटाची घोषणा झाली होती. विकास बहल याचे दिग्दर्शन करत आहे. रिपोर्ट्सनुसार या चित्रपटात टायगर आपल्या वडिलांच्या मृत्यूचा सूड घेताना दिसणार आहे
t 5. ऑथर बनलेली प्रियंकाचा मेमॉयर लॉन्च, अभिनेत्रीने बुकमध्ये अनसीन फोटोंचाही केला समावेश पहिले मॉडल, नंतर अभिनेत्री आणि प्रोड्यूसर बनल्यानंतर प्रियंका चोप्रा आता ऑथर बनली आहे. तिने मंगळवारी आपला मेमॉयर 'अनफिनिश्ड' लॉन्च केला. ज्यामध्ये केवळ तिची पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्याचीच माहिती नाही. तर तिच्या आयुष्यातील काही अनसीन फोटोंचाही समावेश आहे. बुकमधील तिचे काही अनसीन फोटोज व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ती नवीन घरात प्रवेश करताना आणि निक जोनाससोबत साखरपुड्यानंतर पोज देताना दिसत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.