आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पुन्हा कंगना विरुद्ध राऊत:आम्ही फक्त धमकी नव्हे अ‍ॅक्शन घेतो, कंगनाच्या चॅलेंजनंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; अभिनेत्री म्हणाली होती- मुंबईत येते, कुणाच्या बापात हिंमत असेल तर रोखून दाखवा

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याच्या मुद्द्यावरून चित्रपट अभिनेत्री कंगना रनोट आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यात वादाची ठिणगी पडली.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी धमकावल्याचा आरोप करत अभिनेत्री कंगना रनोट हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली. यानंतर तिच्यावर टीकेची चांगलीच झोड उठली. सामान्यांपासून ते सेलिब्रिटी आणि राजकारण्यांनी तिला धारेवर धरले.

दरम्यान कंगनाने आणखी एक ट्विट करत, ‘बरेच लोकं मला मुंबईत परत येऊ नकोस अशी धमकी देत आहेत. म्हणून मी येत्या आठवड्यात 9 सप्टेंबर रोजी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा मी मुंबई विमानतळावर उतरेन तेव्हा पोस्ट करेन. कोणाच्या बापाची हिंमत असेल तर थांबून दाखवा’, असे प्रत्युत्तर दिले आहे.

राऊत म्हणाले - आम्ही फक्त धमकी देत नाही अ‍ॅक्शन घेतो
यावर आता संजय राऊत यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. राऊत म्हणाले की, “ही मुंबई 106 हुतात्म्यांनी मिळवली आहे. या मुंबईचं रक्षण आमच्या पोलिसांनी केलं आहे. 26/11 हल्ला मुंबई पोलिसांनी परतवला, कसाबला याच पोलिसांनी पकडलं, अशा या मुंबई पोलिसांबद्दल कुणीही काहीही बोलत असतील, तर त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी” असे राऊत म्हणाले.

“धमकी वगैरे देण्याची मला सवय नाही, आम्ही अ‍ॅक्शन घेतो, महाराष्ट्रात कमावते, खाते, मुंबई पोलीस त्यांचे रक्षण करते आणि त्यांच्यावरच आरोप कोणी करत असेल तर आम्ही त्यावर आक्षेप घेऊ शकत नाही का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

  • राऊत म्हणतात - मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे

दरम्यान राऊत यांनी एक ट्विट करत मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे, असे म्हटले आहे. ''मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे...ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा.. शिवसेना अशा महाराष्ट्र दुश्मनांचे श्राद्ध घातल्याशिवाय राहाणार नाही. promise,'' अशा आशयाचे ट्विट केले आहे.

  • राम कदम यांच्यावरही साधला निशाणा

संजय राऊत यांनी राम कदम यांच्यावरही निशाणा साधला आहे. ''मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्यांना पाठीशी घालणारे जे कोणी आहेत, त्यांना मुंबईत मतं मागताना लाज वाटली पाहिजे, तुम्हाला POK ने मतं दिली का?'' असा सवाल संजय राऊत यांनी भाजप आमदार राम कदम यांना विचारला.

''राम कदमांनी कंगना रनोटची तुलना झाशीच्या राणीशी करणे हा सर्वात मोठा अपमान आहे, झाशीची राणी ही महाराष्ट्राची वीरकन्या, महाराष्ट्राच्या अस्मितेवर गुळण्या टाकणाऱ्या कोणी स्वत:ला झाशीची राणी समजत असेल, आणि राजकीय पक्ष झाशीच्या राणीचा अपमान करणार असेल, तर राजकारण किती तळाला नेलंय हे स्पष्ट दिसतंय'', असेही संजय राऊत म्हणाले.

  • काय आहे संपूर्ण प्रकरण

सुशांत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याच्या मुद्द्यावरून चित्रपट अभिनेत्री कंगना रनोट आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यात वादाची ठिणगी पडली. मुंबई पोलिसांची भीती वाटते, या कंगनाच्या वक्तव्यावर राऊत यांनी कंगनाला मुंबईत येऊ नये अशी आमची नम्र विनंती आहे. हा प्रकार म्हणजे मुंबई पोलिसांचा अपमानच आहे, असे म्हटलेे होते.

राऊत यांना उत्तर देताना कंगनाने ट्विटमध्ये लिहिले होते की, “शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला खुली धमकी दिली आहे व मुंबईला परत येऊ नको, असे सांगितले आहे. आधी मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या व आता उघड धमकी मिळतेय. अखेर मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी (पीओके) का वाटत आहे?”, असे वक्तव्य कंगनाने केले होते.

0