आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगना विरुद्ध बीएमसी प्रकरण:राऊत यांच्या हरामखोर वक्तव्यावर न्यायमूर्ती कथावाला म्हणाले- आमच्याकडे देखील डिक्शनरी आहे, जर त्याचा अर्थ नॉटी असेल तर नॉटीचा अर्थ काय आहे

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगना रनोटने बीएमसीकडे 2 कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
  • 9 सप्टेंबर रोजी बीएमसीने मणिकर्णिका फिल्म्समध्ये कारवाई केली होती.

अभिनेत्री कंगना रनोटच्या मणिकर्णिका फिल्म्स तोडफोड प्रकरणाची सुनावणी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात झाली. व्हिडिओ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू असलेल्या सुनावणीत खंडपीठाने संजय राऊत यांच्या भाषेच्या ज्ञानावर प्रश्न उपस्थित केला आहे. संजय राऊत यांनी कंगनाला हरामखोर म्हटल्यावर त्याचा अर्थ नॉटी होतो असे म्हटल्याचे तिच्या वकिलांनी कोर्टात सांगितले. त्यावर न्यायमूर्ती कथावाला म्हणाले- आमच्याकडे देखील डिक्शनरी आहे. जर त्याचा अर्थ नॉटी होतो, तर मग नॉटीचा अर्थ काय आहे.

काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी कंगनाला हरामखोर म्हटले होते. त्यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, महाराष्ट्रात हरामखोरचा अर्थ नॉटी होतो. त्याचा दुसरा अर्थ फसवणूक करणारा होतो, असेही ते म्हणाले होते.

  • सुनावणी दरम्यान संजय राऊत यांची ऑडिओ क्लिप दाखवली

कंगनाच्या वतीने ज्येष्ठ वकील डॉ. बीरेंद्र सराफ यांनी तिची बाजू मांडली. ते म्हणाले की, संजय राऊत यांनी कंगनाविरोधात असभ्य भाषेचा वापर केला. आणि तिला हरामखोर म्हणत धडा शिकवणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर न्यायमुर्ती कथावाला यांनी ती क्लिप दाखण्याचे आदेश दिल्यानंतर ती कोर्टात सादर केली गेली.

  • उद्या संजय राऊत यांचे वकील प्रतिज्ञापत्र देतील

संजय राऊत यांचे वकील प्रदीप थोरात म्हणाले की, संजय यांनी आपल्या वक्तव्यात कंगनाचे नाव घेतले नाही. त्यावर खंडपीठाने त्यांना प्रश्न केला की, "तुमच्या अशीलाने तिला हरामखोर मुलगी म्हटले नाही? असे तुमचे म्हणणे आहे का. तुम्ही (राऊत) याचिकाकर्त्याला हरामखोर म्हटले नाही, असे विधान आम्ही नोंदवू शकतो का?' त्यावर उत्तर देताना थोरात म्हणाले की या संदर्भात उद्या ते प्रतिज्ञापत्र दाखल करतील.

  • वर्तमानपत्राने उत्सव साजरा केला होता

कार्यालय तोडल्यानंतर वर्तमानपत्राने ऑफिस तोडल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. हे संपूर्ण देशाने पाहिले, असेही कंगनाच्या वकिलांनी सांगितले. यावर खंडपीठाने यासंदर्भात सर्व पुरावे व कागदपत्रे आणण्यास सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...