आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परदेशी मीडियावर भडकली कंगना:इतर देशात कोरोनाची परिस्थिती बिघडली तेव्हा तेथील नेत्यांची नावे कुणी घेतलेली नाहीत, देश कसा चालवावा सांगणारे हे कोण?

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारताला बदनाम करण्यामागे भारतातील काही बुद्धीजीवी जबाबदार -कंगना

भारतात कोरोनाच्या दुस-या लाटेने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. कोरोनासाठीच्या खास वैद्यकीय सेवा तर दूरच पण लोकांना रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन आणि औषधे देखील मिळत नाहीये. कोरोनामुळे जीव गेला तर स्मशानभूमी आणि कब्रस्तानात जागा सापडत नाहीये. अतिशय चिंताजनक परिस्थिती भारतात निर्माण झाली आहे. यावर परदेशी माध्यमांनी मोदी सरकारला कोंडीत पकडले आहे. मोदी सरकारच्या कार्यक्षमेतवर परदेशी मीडिया प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. यावर अभिनेत्री कंगना रनोट चांगलीच संतापली आहे. इतर देश भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कंगनाने केला आहे.

आता आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर भारताबद्दल अपप्रचार करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. या व्हिडिओत कंगना तिच्या घरात बसलेली दिसतेय. या व्हिडिओतून तिने इतर देशांबद्दल संताप व्यक्त केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ती म्हणाली, 'कृपा करून पहा, परदेशात जाऊन भारतीयांची दयनीय स्थिती दाखवणाऱ्यांसाठी ही चेतावनी आहे. आता तुमची वेळ संपली' म्हणत तिने परदेशात भारताची चुकीची प्रतिमा दाखवणाऱ्यांवर निशाणा साधलाय. या व्हिडिओत तिने परदेशी मासिकांमध्ये भारतातील अंत्यसंस्कारावेळी जळणाऱ्या प्रेतांचे फोटो छापण्यावरूनही नाराजी व्यक्त केली.

केवळ भारताच्याच नेत्याचे नाव बदनाम कशासाठी?

इतर देशांमध्ये जेव्हा कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली होती. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांचा मृत्यू झाला, त्यावेळी कुणी तिथल्या नेत्यांची नावे घेऊन त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनाम केले नाही. भारताला बदनाम करण्यामागे भारतातीलच बुुद्धीजीवी जबाबदार आहेत. तेच या परदेशी माध्यमांचे सोर्स आहेत. भारत सरकारने या उपद्रवींवर काही उकल काढायला हवी असेही कंगनाने म्हटले आहे.

अमेरिकेतील माध्यमांवर साधला होता निशाणा
काही दिवसांपूर्वीच कंगनाने एक ट्विट करत अमेरिकेतील माध्यम्यांवर निशाणा साधला होता. अमेरिकेत जुन्या गॅस लीकच्या घटनेचे आणि मृतदेहांचे फोटो छापून महामारीच्या काळात लोकांमध्ये भीती निर्माण केली जात असल्याचा आरोप तिने अमेरिकेवर केला होता.

परदेशी माध्यमांनी मोदी सरकारविषयी काय म्हटले?

द वॉश्गिंटन पोस्ट
हजारोच्या संख्येने लोक क्रिकेटचे सामने बघायला गेल, कुंभ मेळ्यात गर्दी, निवडणूक रॅली झाल्या.. आणि कोरोना जीवघेणा बनला. द वॉशिंग्टन पोस्ट: निर्बंधातून लवकर दिलासा मिळाल्यामुळे भारतात कोरोनाचा उद्रेक झाला.

द गार्डियन
डोनाल्ड ट्रम्पप्रमाणे मोदी कोरोनाच्या काळात निवडणुकीच्या सभा घेत राहिले. भारतातील बिघडलेल्या परिस्थितीमागे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अती-आत्मविश्वास कारणीभूत ठरला.

द न्यूयॉर्क टाईम्स
चुकीच्या निर्णयांमुळे आणि सरकारच्या दुर्लक्षामुळे भारतात कोरोनाने हाहाकार माजवला.

बातम्या आणखी आहेत...