आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तनु वेड्स मनुची 10 वर्षे:कंगना रनोट म्हणाली - 'या चित्रपटाने माझ्या करिअरची दिशा बदलली, श्रीदेवीनंतर कॉमेडी करणारी मी एकमेव अभिनेत्री ठरली'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बॉक्स ऑफिसवर 36 कोटींची केली कमाई

कंगना रनोट आणि आर. माधवन स्टारर 'तनु वेड्स मनु' या चित्रपटाच्या रिलीजला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. आनंद एल राय दिग्दर्शित हा चित्रपट 25 फेब्रुवारी 2011 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामुळे माझ्या करिअरची दिशा बदलण्यास मदत झाली आणि ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवीनंतर कॉमेडी करणारी मी एकमेव अभिनेत्री ठरली, असे मत कंगनाने व्यक्त केले आहे.

विचित्र भूमिकांमध्ये अडकली होती
कंगनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "मी विक्षिप्त आणि विचित्र भूमिकांमध्ये अडकले होते. या चित्रपटाने माझ्या कारकिर्दीची दिशा बदलली. या चित्रपटाने मला कॉमेडीसोबतच मुख्य प्रवाहातल्या सिनेमांत एन्ट्री दिली. क्वीन आणि दत्तो यांच्यासह मी माझी कॉमिक टायमिंग परफेक्ट केली आणि दिग्गज अभिनेत्री श्रीदेवीनंतर कॉमेडी करणारी एकमेव अभिनेत्री ठरली," असे कंगनाने म्हटले आहे.

'आनंद एल राय यांनी माझे करिअर बनवले'

पुढच्या पोस्टमध्ये कंगनाने चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद एल राय आणि लेखक हिमांशू शर्मा यांचे आभार मानले आहेत, "जेव्हा स्ट्रगलिंग मेकर्स म्हणून ते माझ्याजवळ ही फ्रेंचायझी घेऊन आले, तेव्हा मला वाटले की मी त्यांचे करिअर बनवू शकेन. परंतु त्यांनी माझे करिअर बनवले. कोणता चित्रपट चालेल किंवा कोणता फ्लॉप होईल, हे कुणीही सांगू शकत नाही. हा सर्व नशिबाचा खेळ असतो. तुम्ही माझे नशीब आहात, याचा मला आनंद आहे." असे कंगनाने म्हटले आहे.

बॉक्स ऑफिसवर 36 कोटींची केली कमाई
कंगना रनोट आणि आर माधवन यांच्या व्यतिरिक्त जिमी शेरगिल, स्वरा भास्कर आणि एजाज खान यांनीही 'तनु वेड्स मनु' चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे 36.84 कोटींचा व्यवसाय केला होता.

बातम्या आणखी आहेत...