आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेत्री कंगना रनोट हिने पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कंगनाचा नटी म्हणून उल्लेख केल्यानंतर कंगनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत महाराष्ट्र सरकारने जो अपमान आणि शिवीगाळ केली त्यांच्यापुढे आदित्य पांचोली आणि हृतिक रोशन सारखे लोक मला भले वाटू लागले आहेत, असे ती म्हणाली आहे.
कंगनाने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, "गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्र सरकारकडून इतके कायदेशीर खटले, शिवीगाळ, अपमान आणि बदनामी सहन केली आहे की बॉलिवूड माफिया, आदित्य पांचोली आणि हृतिक रोशनसारखे लोक मला भले वाटू लागले आहेत. माझ्यामध्ये असे काय आहे जे लोक मला एवढा त्रास देतात", असा प्रश्नदेखील तिने विचारला आहे.
The amount of legal cases, abuses, insults, name calling I faced from Maharashtra government in these few months make Bollywood mafia and people like Aaditya Pancholi and Hrithik Roshan seem like kind souls ....
— Kangana Ranaut (@KanganaTeam) November 28, 2020
I wonder what is it about me that rattle people so much 🙂 https://t.co/by2VKQauZt
महापौरांनी आपल्या विधानात काय म्हटले ?
शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने कंगना रनोटच्या बाजूने निकाल दिल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. जी कारवाई झाली ती एमएमसी कायद्यानुसार (MMC Act) झालीय. अनधिकृत बांधकाम (Illegal Construction) सुरू असताना 354 अ अंतर्गत 24 तास अगोदर नोटीस दिली होती असे त्या म्हणाल्या होत्या. कारवाई सुडापोटी केली असेल तर मग त्या नटीने पीओके म्हणून जो अपमान मुंबईचा केला, त्यावर कुठल्या कोर्टात दाद मागायची ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
एमएमसी कायद्यानुसार कारवाई करा असे कोर्टाने यापूर्वी अनेकदा सांगितले आहे. मग कंगना प्रकरणात काय उणिवा राहिल्या ? त्या पाहू, असे त्या म्हणाल्या. कोर्टाच्या निर्णयावर बोलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कंगनालाच ही नोटीस पहिल्यांदा दिलीय, असे नाही. अशा अनेक नोटीसा पूर्वी दिल्या गेल्या आहेत. मग आताच असे काय झाले ? या निर्णयाचा परिणाम संपूर्ण मुंबईतील अनधिकृत बांधकामांसंदर्भात होईल असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
याउलट महाराष्ट्रावर सूड उगवला जातोय. ज्यांचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही ते ओकाऱ्या टाकून जातायत. यामुळे मुंबईकर संभ्रमात आहेत. परंतु त्यांना काय चाललंय ते चांगले कळतंय असेही महापौर म्हणाल्या.
'तुम्ही व्हिलन झालात म्हणूनच मी हिरो ठरले'
कंगना रनोट हिला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. कंगना रनोटच्या बंगल्यावर झालेली कारवाई बेकायदा होती असे शुक्रवारी न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर कंगनाने तिच्या आगामी थलाइवीच्या शूटिंग सेटवरुन सोशल मीडियावर एक थँक्यू व्हिडिओ शेअर केला आहे, यात तिने आपल्या या विजयाला लोकशाहीचा विजय म्हटले आहे.
"मला एक खूप चागंली बातमी मिळाली आहे. न्यायालयाचा निर्णय माझ्या बाजुने आला आहे. मी न्यायलयाची आऱाही आहे. मी म्हटल्याप्रमाणे जेव्हा एखादी व्यक्ती सरकारविरोधात उभी राहते आणि विजय मिळवते तेव्हा हा त्याचा एकट्याचा नाही तर लोकशाहीचा विजय असतो. मला हिंमत देणाऱ्या सर्वांचे आभार आणि माझ्या तुटलेल्या स्वप्नांवर हसणाऱ्यांचेही आभार. कारण तुम्ही व्हिलन झालात म्हणूनच मी हिरो ठरले", अशी प्रतिक्रिया कंगनाने दिली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.