आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अटकेवरुन वाद:कंगना रनोटने पुन्हा एकदा साधला उद्धव सरकारवर निशाणा, म्हणाली -'मुंबईत हा काय गुंडाराज सुरू आहे, जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणी प्रश्नही विचारु शकत नाही?'

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हरियाणातील युट्यूबर साहिल चौधरीच्या अटकेवरुन कंगनाने संताप व्यक्त केला आहे.

अभिनेत्री कंगना रनोट हिने पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. हरियाणातील युट्यूबर साहिल चौधरीच्या अटकेवरुन कंगनाने संताप व्यक्त करत मुंबईत गुंडाराज सुरु असल्याचा आरोप केला आहे. इतकेच नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून तिने उल्लेख केला आहे.

मुळचा हरियाणाचा असलेला युट्यूबर साहिल चौधरीने अलीकडेच महाराष्ट्र सरकारवर टीका केली होती. या प्रकरणात साहिल चौधरीला अटक करण्यात आली आहे. त्याच्या अटकेनंतर कंगनाने ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

आपल्या पहिल्या ट्विटमध्ये साहिल चौधरीशी संबंधित एक ट्विट रिट्विट करत कंगनाने लिहिले, 'मुंबईत हा काय गुंडाराज सुरू आहे. जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यंमंत्र्यांना व त्यांच्या टीमला कुणी प्रश्नही विचारु शकत नाहीये? ते आमच्यासोबत काय करु शकतात? आमचे घर तोडतील आणि आम्हाला मारतील? काँग्रेस पार्टी याला उत्तरदायी कोण?,' असा प्रश्न कंगनाने उपस्थित केला आहे. सोबतच #istandwithsaahilchoudhary हा हॅशटॅग वापरला आहे.

  • अनुराग कश्यप स्वतंत्र फिरत आहे

आपल्या पुढच्या ट्विटमध्ये कंगनाने लिहिले, 'साहिलने महाराष्ट्र सरकारला त्यांच्या कामावरून प्रश्न विचारले म्हणून कुणीतरी त्याच्याविरोधात अचानक गुन्हा दाखल केला, जो की त्याचा लोकशाही अधिकार आहे. त्यानंतर साहिलला तत्काळ तुरुंगात टाकण्यात आले. पण, पायल घोषने अनुराग कश्यपविरोधात अनेक दिवसांपूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तो मात्र स्वतंत्रपणे फिरतोय. काँग्रेस पार्टी हे सगळं काय आहे,' असा पुन्हा प्रश्न कंगनाने केला आहे.

  • क्राइम ब्रांचने साहिलला रिमांडवर घेतले

कंगनाने साहिलच्या सुटकेची मागणी करणारा एक रिपोर्ट शेअर केला असून त्यात लिहिले आहे, 'साहिल चौधरी यांना मुंबई गुन्हे शाखेने 3 दिवसांच्या रिमांडवर घेतले आहे. ही कारवाई एखाद्याने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे करण्यात आली आहे. कारण साहिलने सुशांत सिंह राजपूत प्रकरणात महाराष्ट्र सरकारवर प्रश्न उपस्थित केला होता. त्याला मदतीची गरज आहे.' कंगनानेही आपले दोन्ही ट्विट कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलला टॅग केले होते.

  • कंगना आणि शिवसेना सरकारचा वाद

कंगना रनोटने अलीकडेच मुंबई पोलिसांवर टीका करत मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते, असे विधान केले होते. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाला मुंबई सोडण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अनेकदा टीका केली होती. हा वाद आणखी पेटला जेव्हा बीएमसीने कंगनाच्या मुंबईतील ऑफिसमध्ये तोडफोड केली. त्यानंतर कंगनाने मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर बरीच टीका केली होती. तेव्हापासून कंगना सातत्याने राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांविषयी आक्रमक होताना दिसतेय.