आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगनाविरोधात देशद्रोहाचा खटला:कंगना रनोटने न्यायालयाला सांगितले - माझ्या ट्विटमुळे हिंसा झालेली नाही किंवा कोणता गुन्हा घडलेला नाही

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाचे वकील म्हणाले - आदेश देताना सारासार विचार करण्यात आलेला नाही

मी केलेल्या ट्विटमुळे कधीही हिंसा झालेली नाही किंवा कोणता गुन्हा घडलेला नाही, असा दावा अभिनेत्री कंगना रनोटच्या वतीने सोमवारी उच्च न्यायालयात करण्यात आला. वांद्रे महानगर दंडाधिकाऱ्यांनी देशद्रोहाच्या आरोपाअंतर्गत कंगनावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात कंगनाने उच्च न्यायालयात धाव घेत देशद्रोहाचा गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 26 फेब्रुुवारीला होणार असून तो पर्यंत कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांना अटक न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

न्यायालयात कंगनाच्या वकिलांचा युक्तीवाद
न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर कंगनाच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. त्या वेळी तिच्या वतीने वकील रिजवान सिद्दीकी यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, 'कंगनाच्या ट्विटमुळे आतापर्यंत कोणतीही हिंसा झालेली नाही किंवा कोणताही फौजदारी गुन्हा घडलेला नाही. त्यामुळे वांद्रे महानगर दंडाधिकाऱ्यांनी कंगनाविरोधात देशद्रोहाच्या आरोपाअंतर्गत कारवाई करण्याचा दिलेला आदेश चुकीचा आहे.' तसेच वांद्रे महानगर दंडाधिकाऱ्यांच्या आदेशासह कंगनाविरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली.

कंगनाचे वकील म्हणाले - आदेश देताना सारासार विचार करण्यात आलेला नाही
रिजवान सिद्दीकी यांनी कंगनाच्या वतीने न्यायालयाला सांगितले, 'गुन्हा नोंदवण्याचा आदेश देताना सारासार विचार करण्यात आलेला नाही. जे कलम लावण्यात आले आहे, त्याअंतर्गत मी कोणताही गुन्हा केलेला नाही. माझ्या ट्विटवर लोकांनी प्रतिक्रिया दिली नाही. त्याचे हिंसाचारात रुपांतर झाले नाही. त्यामुळे मला शिक्षा होऊ शकत नाही.'

कंगनावर याचिकाकर्त्याचे हे होते आरोप
कास्टिंग डायरेक्टर आणि फिटनेस ट्रेनर साहिल अशरफ अली सैय्यद यांनी प्रथम मुंबई पोलिसात अर्ज दाखल केला होता. मात्र पोलिसांनी अर्जाची दखल न घेतल्याने त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. कंगना रनोेटने काही दिवसांपूर्वी बॉलिवूडवर टीका करताना या ठिकाणी मुस्लिमांचे प्राबल्य असल्याचे वक्तव्य केले होते. मी झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवून हे इस्लामी प्राबल्य मोडून काढले, अशी मुक्ताफळे कंगनाने उधळली होती. या पार्श्वभूमीवर मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सैय्यद यांनी वांद्रे कोर्टात कंगनाविरुद्ध याचिका दाखल केली होती.

कंगना वारंवार बॉलिवूडची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियापासून प्रसारमाध्यमांपर्यंत प्रत्येक ठिकाणी ती बॉलिवूडच्या विरोधात बोलते. ती प्रत्येक वेळी बॉलिवूडमधील घराणेशाहीबद्दल बोलत असते, असा आरोप याचिकाकर्त्याने याचिकेत केला होता. यानंतर वांद्रे न्यायालयाने कंगनाविरोधात धार्मिक तेढ पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

कंगनाने बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लिम कलाकारात एक विशिष्ट अंतर निर्माण केले आहे. ती नेहमी काही ना काही आक्षेपार्ह ट्विट करते. ज्यामुळे केवळ धार्मिक भावनाच नाही तर चित्रपटसृष्टीतील बरेच लोक यातून दुखावले जातात, असा आरोपही तिच्यावर याचिकेतून केला होता.

बातम्या आणखी आहेत...