आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेमकी भानगड आहे तरी काय?:कंगना रनोटच्या 'चली चली' गाण्यावर थिरकला चक्क करण जोहर, कंगना म्हणाली - मी पाहिलेला हा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट व्हिडिओ

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • करणचा हा व्हिडिओ जुना आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोटच्या आगामी 'थलायवी' या चित्रपटाकील 'चली चली' हे पहिले गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. हे गाणे रिलीज झाल्यानंतर तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर #CaliChaliChalenge सुरु केले आहे. ज्यात लोक या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. दरम्यान, करण जोहरचा एक डान्स व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. यात करण डान्स करताना दिसतोय. खरं तर करणचा हा व्हिडिओ जुना आहे. मात्र एका चाहत्याने त्यात कंगनाचे गाणे एडिट करुन वापरले आहे.

विशेष म्हणजे हा व्हिडिओ कंगनादेखील शेअर केला आहे आणि लिहिले की, ’हा मी पाहिलेला आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट व्हिडिओ आहे. मी आता यावर करणची काय प्रतिक्रिया असेल याची वाट बघतेय.’

‘थलाइवी’साठी वाढवले होते कंगनाने 20 किलो वजन

‘थलाइवी’ हा चित्रपट तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात जयललिता यांची भूमिका करण्यासाठी कंगनाने आपले वजन सुमारे 20 किलोने वाढवले होते. हा चित्रपट येत्या 23 एप्रिल रोजी तामिळ, तेलगू आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चली चली या गाण्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.

कंगनाचे अपकमिंग प्रोजेक्ट्स
या वर्षात कंगनाच्या हाती अनेक प्रोजेक्ट्स आहेत. आगामी ‘धाकड’ या स्पाय थ्रिलर चित्रपटात कंगना एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. 'धाकड'शिवाय कंगना सध्या' तेजस 'चित्रपटाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. तसेच कंगनाने 'मणिकर्णिका रिटर्न्स: दि लिजेंड ऑफ दिड्डा' आणि 'अपराजिता अयोध्या' नावाच्या चित्रपटांची घोषणा देखील केली. इतकेच नाही तर अद्याप नाव ठरलेल्या आणखी एका चित्रपटात कंगना देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र कंगना इंदिरा गांधी यांची भूमिका ज्या चित्रपटात साकारणार आहे, तो बायोपिक नसणार आहे. 'रिवॉल्व्हर रानी' या चित्रपटात कंगना रनोटसोबत काम करणारे दिग्दर्शक साई कबीर या चित्रपटाची कथा आणि स्क्रिनप्लेवर काम करत आहेत. याशिवाय चित्रपटाची दिग्दर्शनाची धुरादेखील तेच सांभाळणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...