आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगना नरमली?:सकाळच्या पहिल्या ट्विटमध्ये कंगनाने कुणालाही डिवचले नाही; उलट आईवडिलांचा आवडता फोटो शेअर करुन लिहिला इमोशनल मेसेज

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाने 19 सप्टेंबर रोजी आपल्या आईवडिलांचा आवडता फोटो शेअर करुन लव्ह लेटर लिहिणा-या पिढीची आठवण करून दिली.
  • 3 सप्टेंबर रोजी मुंबईची पाकव्याप्त काश्मीरसोबत तुलना केल्यानंतर कंगना रनोट सतत वादात आहे.

शिवसेना आणि बॉलिवूडमधील वादाच्या पार्श्वभूमीवर कंगना थोडी नरमली असल्याचे चित्र शनिवारी दिसले. आज सकाळी तिने ट्विटरच्या माध्यमातून कुणालाही डिवचले नाही. उलट आपल्या आईवडिलांचा एक फोटो शेअर करुन तिने भाविनक संदेश लिहिला. "माझ्या आईवडिलांचा सर्वात आवडता फोटो. आईला रोमँटिक फोटो काढायचे होते आणि वडिलांना मात्र थोडे विचित्र वाटत होते. (हसून) लव्ह लेटर आणि डोळ्यातून रोमान्स करणारी पिढी. रंजक," अशा आशयाचे ट्विट कंगनाने केले आहे.

गेल्या 15 दिवसांपासून कंगना सतत शिवसेना आणि बॉलिवूडवर हल्ला करत आहे. पण खास गोष्ट म्हणजे दिवसभर संताप व्यक्त करणारी कंगना तिच्या सकाळची सुरुवात मात्र सकारात्मक ट्विटने करते. कंगनाचे 15 दिवसांचे पहिले ट्विट खालीलप्रमाणे आहेतः

4 सप्टेंबर रोजी कंगना आपल्या पहिल्या ट्विटमध्ये योग सत्राविषयी बोलली होते. तिने लिहिले की योगा हा तिच्या संपूर्ण दिवसातील सर्वात आवडता वेळ असतो.

5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त कंगनाने तिच्या बालपणीचा एक फोटो शेअर केला होता. "माझ्या अॅनुअल डेचा फोटो, कदाचित पहिल्या वर्गाचा. आम्ही सादरीकरण करुन शिक्षकांकडून भेटवस्तू मिळवल्या होत्या. माझ्या आयुष्यात ब-याच शिक्षकांचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष योगदान आहे. सर्वांचे मनापासून आभार," असे ट्विट कंगनाने केले होते.

6 सप्टेंबर रोजी कंगनाने 2014 मधील एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, "2014 चा वर्ग. क्वीन चित्रपटानंतर मला स्क्रीन रायटिंगबद्दलची उत्सुकता होती. मी एक वर्ष न्यूयॉर्कमध्ये राहिले आणि स्क्रीन राइटिंगचा कोर्स पूर्ण केला. फेअरवेलच्या दिवशी माझ्या वर्गातील मुलींनी आमचे आवडते प्रोफेसर गोलन रमराज यांना डिनर ट्रीट देण्याचे ठरविले. हा क्षण त्या सुंदर रात्री कॅमे-यात कॅप्चर झाला होता."

7 सप्टेंबर रोजी कंगनाने आपल्या पहिल्या ट्विटमध्ये आपल्या भाच्याचा फोटो शेअर केला होता.

8 सप्टेंबर रोजी कंगनाने बनारसमधील गंगा घाटाचा फोटो शेअर केला आणि लिहिले की, "हे चित्र वाराणसीचे आहे, जिथे मी नावेतून फिरले. बाह्य दृश्य खूप सुंदर आहे आणि मी फोनला चिकटून आहे."

9 सप्टेंबर हा पहिला दिवस होता जो कंगनाच्या वादाशी जोडलेला होता. मुंबईत तिच्या आगमनावर विरोध झाला होता. यावर तिने आपण राणी लक्ष्मीबाई यांच्या मार्गावर चालणार असून ना घाबरणार, ना माघार घेणार असे म्हटले होते.

10 सप्टेंबर रोजी कंगनाने ईशा योग केंद्राचा फोटो शेअर केला आणि लिहिले की, कंगना म्हणाली, “हा माझा सर्वात आवडता फोटो आहे. हा माझ्या इशा योग सेंटरमध्ये काढण्यात आला. त्यावेळी काहीही ठरलेले नव्हते, सहजपणे हा फोटो काढला गेला. मात्र, यात माझ्या आयुष्याला मिळालेली कलाटणी सुंदरपणे स्मित हास्यासह दिसत आहे.”

11 सप्टेंबर रोजी कंगनाने तिच्या शाळेच्या दिवसांचा एक फोटो शेअर केला होता. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "मन तीव्र आणि धूर्त आहे. भावना स्वभावाने भोळी आणि सूक्ष्म आहेत. आपल्या मनावर आपल्या भावनांचे प्रभुत्व येऊ देऊ नका. त्या लहान भावना आपल्या मनाच्या आत कोप-यात धरून ठेवा.'

12 सप्टेंबर रोजी कंगनाने तिच्या सोमनाथ यात्रेचा एक फोटो शेअर केला आणि नावाचा उल्लेख न करता तिने शिवसेनेला लक्ष्य केले होते. कंगनाचे ट्विट: -

13 सप्टेंबर रोजी शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारच्या वादाच्या दरम्यान पहिल्यांदा ट्विटमध्ये कंगनाची निराशा दिसून आली. तिने लिहिले, "या अनागोंदीमुळे बर्‍याच वेळा मला असे वाटते की माझ्यावर खूप परिणाम होत आहे. मी कोठे आहे? मी ओळखत नाहीये. आयुष्य माझ्यासमोर आव्हानं आणते आणि मी त्यांचा सामना करण्याचा प्रयत्न करते. पण आव्हानं येतच असतात. मी शर्थीचे प्रयत्न करत राहते. पण मी मला पुन्हा अडकत जाते."

14 सप्टेंबर रोजी कंगनाने आपल्या भाच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, "गुड मॉर्निंग, फक्त एक विचार. मला वाटते की आपण जेवढा विचार करतो, त्यापेक्षा कितीतरी पटीने लहान मुले विचार करण्यास सक्षम असतात. जेव्हा तो विचारांमध्ये गुंग असतो, तेव्हा मला आश्चर्य वाटतं की तो काय अनुभवत आहे!"

15 सप्टेंबर रोजी कंगनाने तिचा एक फोटो शेअर केला होता. तिने लिहिले, "एका महिलेची करुणा आणि सौम्यतेला अनेकदा तिच्यातील दुर्बलता समजले जाते. कोणालाही कधीही एवढे खाली ढकलू नका की त्याच्याकडे गमावण्यासाठी काहीच उरणार नाही. तुम्ही फक्त त्यांना स्वातंत्र्य देता, परंतु बहुतेक लोकांना ठाऊक नसतं की असे लोक केवळ धोकादायकच नव्हे तर जीवघेणा देखील बनतात.'

16 सप्टेंबर रोजी कंगनाने बॉलिवूडवर निशाणा साधला आणि त्याला जहरी म्हटले. कंगनाने लिहिले, "शो बिझनेस नेहमीच विषारी असतो. लाइट आणि कॅमे-याच्या या जगात लोक त्यावर विश्वास ठेवू लागतात आणि त्यातच जगतात. लोक एका वैकल्पिक सत्यावर विश्वास ठेवू लागतात आणि त्यांच्याभोवती एक वर्तुळ बनवतात. या भ्रमातून मुक्त होण्यासाठी बळकट आध्यात्मिक शक्ती आवश्यक आहे."

17 सप्टेंबर रोजी कंगनाने पहिले ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी केले होते.

18 सप्टेंबर रोजी कंगनाने एक फोटो शेअर केला होता, त्याला कॅप्शन दिले होते, "माझी मूलं".

बातम्या आणखी आहेत...