आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'थयालवी'तील नवीन लूक:कंगना रनोटने दाखवली 'थयालवी'ची नवी झलक, शेअर केला अभिनेते अरविंद स्वामींसोबतचा रोमँटिक फोटो

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एमजीआर यांच्या जयंतीनिमित्त कंगनाने रिव्हील केला 'थलायवी' चित्रपटातील रोमँटिक फोटो

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट लवकरच थलायवी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलीकडेच कंगनाने या चित्रपटातील एक नवीन फोटो शेअर केला आहे. यात ती दाक्षिणात्य अभिनेते अरविंद स्वामी यांच्यासोबत दिसत आहे. या चित्रपटात अरविंद स्वामी यांनी अभिनेते आणि राजकारणी एमजी रामचंद्रन यांची भूमिका वठवली आहे.

कंगनाने एमजीआर यांच्या 104 व्या जयंतीच्या निमित्ताने हे छायाचित्र शेअर करुन त्यांना श्रद्धांजली दिली आहे. एमजीआर यांनीच जयललिता यांना चित्रपटसृष्टीतून राजकारणात आणले होते. कंगनाने हे छायाचित्र शेअर करताना लिहिले, 'महान एमजीआर यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्रद्धांजली. क्रांतीकारी नेते आणि थलायवींचे मेंटॉर.'

‘थलाइवी’ हा चित्रपट तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात जयललिता यांची भूमिका करण्यासाठी कंगनाने आपले वजन सुमारे 20 किलोने वाढवले होते. हा चित्रपट तामिळ, तेलगू आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

कंगनाचे अपकमिंग प्रोजेक्ट्स

नवीन वर्षात कंगनाच्या हाती अनेक प्रोजेक्ट्स आहेत. अलीकडेच तिने सोशल मीडियावर सांगितले होते की, ती तिच्या आगामी ‘धाकड’ चित्रपटाची तयारी करत आहे. 2021 च्या जानेवारीच्या सुरुवातीला ती शुटिंगला सुरुवात करणार आहे. या स्पाय थ्रिलर चित्रपटात कंगना एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगनाने तिच्या चित्रपटाच्या तयारीचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोमध्ये कंगना प्रोस्थेटिक मेजरमेंट देताना दिसली होती. यापूर्वी 'थलायवी' चित्रपटातही कंगनाने ही प्रक्रिया वापरली होती. 'धाकड'च्या तयारीशिवाय कंगना सध्या' तेजस 'चित्रपटाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे.

‘मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ दिद्दा’ची घोषणा
अलीकडेच कंगनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून 2018 मध्ये रिलीज झालेला ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’चा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आणत असल्याची घोषणा केली. तिच्या या आगामी चित्रपटाचे नाव ‘मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ दिद्दा’ असेल. या चित्रपटाची निर्मितीदेखील ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’चे निर्माते कमल जैन करणार आहेत. या चित्रपटासंदर्भात कंगना म्हणते, तिच्या उर्वरित चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतरच मी ‘मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ दिद्दा’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल. सूत्रानुसार, कंगना या चित्रपटाचे शूटिंग जानेवारी 2022 मध्ये सुरू करणार आहे. कंगना आणि कमल जैनने गेल्या आठवड्यातच चित्रपटाची फायनल स्क्रिप्ट तयार केली आहे. हा चित्रपट मागील चित्रपटापेक्षा भव्य आणि मोठ्या बजेटचा असेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वत: कंगना करणार आहे, की दुसरे काेणी करणार हे अजून ठरले नाही.

बातम्या आणखी आहेत...