आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगनाच्या भावाचे डेस्टिनेशन वेडिंग:कंगना रनोटने शेअर केला भावाचा मेहंदीचा फोटो,  स्वत: लावली भावाच्या हातावर मेहंदी

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अक्षत आणि रितूचे लग्न राजस्थानी थीमवर होत आहे.

अभिनेत्री कंगना रनोटचा धाकटा भाऊ अक्षतच्या लग्नाच्या विधी उदयपुरमध्ये सुरू आहेत. आज अक्षत रितू सागवानसोबत विवाहबद्ध झाला. तत्पूर्वी बुधवारी अक्षत आणि त्याची भावी पत्नी रितूचा मेहंदी सोहळा पार पडला. कंगनाने ट्विटरवर आपल्या भावाच्या मेहंदी सेरेमनीचा फोटो शेअर करत लिहिले, "माझ्या भावाच्या हातावरची ही छोटी आकाशगंगा मी बनवली आहे." फोटोत अक्षत रितूबरोबर हातावरची मेहंदी दाखवताना दिसत आहे.

कंगनाने आणखी एका ट्विटमध्ये स्वतःचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती लीला पॅलेसमध्ये ट्रेडिशनल आउटफिटमधअये पोज देताना दिसत आहे. "भावाचे लग्न", असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.

12 नोव्हेंबरला अक्षतचे लग्न

अक्षत आणि रितूचे लग्न राजस्थानी थीमवर होत आहे. यानिमित्ताने वर आणि वधूचे कुटुंब 10 नोव्हेंबर रोजी उदयपुरला पोहोचले. लग्नाचे कार्यक्रम 2 दिवस चालतील. बुधवारी हळद व संगीतनंतर अक्षत आणि रितू गुरुवारी सकाळी 9: 15 वाजताच्या मुहूर्तावर लग्नाच्ये बेडीत अडकले. संध्याकाळी रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. यात दोन्ही कुटुंबातील निवडक लोकांचा समावेश असेल.

कंगनाने डेस्टिनेशन वेडिंगची दिली होती माहिती

यापूर्वी कंगनाने एका ट्विटमध्ये भावाच्या लग्नाविषयी सांगताना लिहिले होते की, "माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी ही सुंदर वेळ आहे. मी उदयपुर येथे भावाचे डेस्टिनेशन वेडिंग आयोजित करत आहे. येथे रनोट फॅमिली एकत्र येईल. कोरोनामुळे कार्यक्रम छोटेखानी ठेवण्यात आला आहे. परंतु उत्साह तोच आहे."

बातम्या आणखी आहेत...