आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री कंगना रनोट हिने शुक्रवारी शिवसेनेसह काँग्रेसवर निशाणा साधला. तिने आज सकाळी तीन ट्विट केले. आपल्या एका ट्विटमध्ये कंगना म्हणाली, 'सोनिया गांधीजी, तुमच्या सरकारने महाराष्ट्रात मला जी वागणुक दिली त्यामुळे एक महिला म्हणून तुम्ही दु:खी नाहीत का? डॉ. आंबेडकरांनी बनवलेल्या राज्यघटनेच्या तत्त्वांचे पालन करण्याचे आपण आपल्या सरकारला आवाहन करू शकत नाही का?, असा प्रश्न तिने सोनिया गांधींना केला आहे.
कंगनाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ शेअर करुन शिवसेनेच्या सध्याच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे. ''महान नेते असलेले बाळासाहेब ठाकरे हे माझे सर्वात आवडत्या नेत्यांपैकी आणि आदर्शांपैकी एक होते. कधीतरी शिवसेना गटातटाच्या राजकारणात सामील होईल आणि काँग्रेस बनेल, अशी भीता त्यांना वाटायची. आता त्यांच्या पक्षाची सध्याची स्थिती पाहून त्यांची भावना काय असती,'' असे कंगनाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
9 सप्टेंबर रोजी मनपाच्या पथकाने कंगनाच्या मुंबईस्थित ऑफिसवर अवैध बांधकाम पाडण्याची कारवाई केली होती. याच दिवशी कंगना हिमाचलहून मुंबईत दाखल झाली होती. आल्या आल्या कंगनाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. तिने एक व्हिडिओ शेअर केला ज्यात तिने उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला होता. “आज माझे घर तोडले, उद्या तुमचे गर्वहरण होईल, काळाचे चक्र फिरेल,'' अशा शब्दांत तिने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली होती. तिने काही छायाचित्रेही शेअर केली.
मनपाकडून करण्यात आलेल्या तोडफोडीत कंगनाच्या ऑफिसचे दोन कोटींचे नुकसान झाल्याचे समजते. या ऑफिससाठी कंगनाने तब्बल 48 कोटी रुपये खर्च केले होते. आता या ऑफिसची डागडुजी करण्यासाठी माझ्याजवळ पैसे नसल्याचे कंगनाने सांगितले आहे. तिने ट्विट केले, “माझे ऑफिस 15 जानेवारी रोजी सुरु होणार होते. मात्र त्याच काळात कोरोनाचे संकट आले, त्यामुळे आम्ही जे काही काम करायचं होते ते अर्ध्यावरच थांबवले होते. मात्र आता या कार्यालयाची डागडुजी करण्यासाठी किंवा ते उभारण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत. मी याच उद्धवस्त झालेल्या, तोडलेल्या ऑफिसमधून काम करण्यास सुरुवात करेल. हे उद्धवस्त झालेले ऑफिस एक प्रतिक आहे, जी स्त्री या जगात स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करते तिच्यासोबत असेच होते हे यातून सांगण्यात येतंय”, असे ट्विट कंगनाने केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.