आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॉन्ट्रोव्हर्सी:वादग्रस्त  ट्विटनंतर कंगनाची बहीण रंगोलीचे ट्विटर अकाऊंट सस्पेन्ड, या कारवाईवर म्हणाली - हे पूर्णपणे पक्षपाती पाऊल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अकाऊंट सस्पेंड झाल्यापासून रंगोली चंदेलने ट्विटर इंडिया ट्रेंडमध्ये चौथ्या क्रमांकावर ट्रेंड करतेय.

कंगना रनोटची बहीण रंगोली चंदेलचे ट्विटर अकाऊंट वादग्रस्त पोस्टमुळे गुरुवारी सस्पेंड करण्यात आले आहे. रंगोलीने एका ट्विटमध्ये डॉक्टर आणि आरोग्य कर्मचा-यांवरील हल्ल्याचा निषेध केला होता. या ट्विटमध्ये धार्मिक आणि माध्यमांना लक्ष्य करून वादग्रस्त विधान लिहिले गेले होते. यानंतर तिचे खाते सस्पेंड करण्यात आले. अकाऊंट सस्पेंड झाल्यापासून रंगोली चंदेलने ट्विटर इंडिया ट्रेंडमध्ये चौथ्या क्रमांकावर ट्रेंड करतेय. यावर दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 6 हजाराहून अधिक ट्वीट आले होते. 

आरोग्य कर्मचार्‍यांवर हल्ल्याविषयी बोलले तर अकाऊंट सस्पेंड केले - रंगोली रिपोर्ट्सनुसार, अनेकदा आपल्या वक्तव्ये आणि पोस्टविषयी चर्चेत असणार्‍या रंगोलीने ट्विटरच्या या कारवाईचे एकतर्फी वर्णन केले आहे. ती म्हणाले की हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अमेरिकन आहे आणि ते आमच्याशी भेदभाव करतात. या ठिकाणी आपल्या देवी-देवतांची थट्टा केली जाऊ शकते, परंतु आपण आरोग्य कर्मचा-यांवरील हल्ल्याबद्दल काही बोललो तर हे पाऊल उचलले जाते.

रंगोलीचे अकाऊंट सस्पेंड केल्यावर चित्रपट निर्माती रीमा कागती यांनी मुंबईपोलिसांना टॅग करत एक ट्विट केले आहे. त्यांनी रंगोलीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. रीमा यांनी लिहिले- मुंबई पोलिस या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करतील का? ही बनावट बातमी आणि द्वेष पसरवणे नाही का? हा ठराविक लोकांवरचा हिंसाचार नाही का?

अभिनेत्री कुब्रा सैतनेही ट्विटरवर लिहिले- मी रंगोलीला ब्लॉक केले आहे. त्यानंतर ट्विटरवर रिपोर्ट केली आहे. मुंबई पोलिस, महाराष्ट्र सीएमओ तुम्ही लक्षात घ्या की अशाप्रकारे द्वेष पसरवणे बेजबाबदार आहे.

बातम्या आणखी आहेत...