आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वरा-तापसीवर भडकली रंगोली:कंगनाची बहीण रंगोलीने स्वरा-तापसीला म्हटले बी-ग्रेड अ‍ॅक्ट्रेस, सांगितले -  आमच्या वाईट काळात त्या आमच्यावर हसत होत्या

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रंगोलीच्या म्हणण्यानुसार, जेव्हा बीएमसीने कंगनाच्या कार्यालयात तोडफोड केली तेव्हा स्वरा आणि तापसी तिच्यावर हसत होत्या.

अभिनेत्री कंगना रनोटची बहीण रंगोली चंदेल हिने स्वरा भास्कर आणि तापसी पन्नू यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. रंगोलीने या दोघींचा उल्लेख बी-ग्रेड अ‍ॅक्ट्रेस असा केला आहे. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर तिने ही प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाच्या बंगल्यावर झालेली कारवाई बेकायदा होती असे शुक्रवारी न्यायालयाने स्पष्ट केले आहे. रंगोलीच्या म्हणण्यानुसार, जेव्हा बीएमसीने कंगनाच्या कार्यालयात तोडफोड केली तेव्हा स्वरा आणि तापसी तिच्यावर हसत होत्या.

'बी-ग्रेड अभिनेत्रींना पाहून खूप दुःख झाले'
रंगोलीने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, "एक गोष्ट ज्याकडे मी दुर्लक्ष करू शकत नाही आणि सांगू इच्छिते की, आम्ही जेव्हा कुटुंब म्हणून सर्वात वाईट काळातून जात होतो, तेव्हा स्वरा आणि तापसी या बी ग्रेड अभिनेत्रींकडे बघून खूप दुःख झाले. त्या दोघीही कंगनाचे ऑफिस उद्धवस्त होताना तिची खिल्ली उडवत होत्या. त्यांनी याला कायदेशीर कारवाई म्हटले होते."

'कंगनाने कायदेशीर कारवाई करु दिली नव्हती'
रंगोलीने पुढे लिहिले, "मी त्यांना (स्वरा आणि तापसी) न्यायालयात खेचू शकले असते. पण कंगनाला त्यांच्याविरूद्ध कोणतीही कारवाई नको होती. या बी ग्रेड अभिनेत्रींकडे बघा. या कंगनाविरुद्ध जे काही बोलतील त्यावर विश्वास ठेवू नका."

'मी या निर्लज्ज लोकांबद्दल माहिती देत ​​राहिल'
रंगोलीने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, "एक महत्वाची नोटीस. पाली हिल येथील आमच्या मालमत्तेच्या अवैध तोडफोडीदरम्यान लोकांनी चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला होता. अशा समाजकंटकांपासून सावध रहा. मी तुम्हाला या निर्लज्ज लोकांची देत राहिल."

कोर्टाने आपल्या निर्णयात काय म्हटले?
मुंबई महापालिकेकडून अभिनेत्री कंगना रनोटच्या बंगल्यावर झालेली कारवाई बेकायदा होती असे शुक्रवारी मुंबई हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, कंगनाला ही कारवाई थांबवण्यासाठी कायदेशीर मदत सुद्धा मिळू नये असे प्रयत्न झाले. मुळात बीएमसीने (बृहन्मुंबई महापालिका) कंगनाच्या बंगल्यावर कारवाईसाठी जी नोटिस बजावली होती तीच हायकोर्टाने रद्दबातल ठरवली. ही कारवाई कंगनाच्या सोशल मीडियावर झालेल्या कॉमेंट्सवरून झाली असावी असेही कोर्टाने म्हटले. सोबतच, कंगनाला सार्वजनिक ठिकाणी दिल्या जाणाऱ्या विधानांवर संयम बाळगण्याची ताकीद दिली.

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे, नेते आणि मुख्यमंत्र्यांविरुद्ध सरकारी अधिकाऱ्यांवर उलट सुलट विधाने करणे कंगनाच्या या वृत्तीवरून महाराष्ट्रात तिच्यावर भरपूर टीका झाली होती. त्यावरूनच हायकोर्टाने सुद्धा कंगनाची कानउघडणी केली. भविष्यात तिने सार्वजनिकरित्या वादग्रस्त विधाने करणे टाळावे असा समज तिला कोर्टाने दिला आहे.

अभिनेत्री कंगना रनोटने बीएमसीकडून आपल्याविरुद्ध झालेल्या कारवाईच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर जस्टिस एसजे कैथावाला आणि आरआय छागला यांच्या बेंचने हा निकाल दिला. बीएमसीने 9 सप्टेंबर रोजी कंगनाच्या पाली हिल येथील बंगल्यावर अवैध निर्माणची नोटिस बजावून कारवाई केली होती.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser