आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगनाने मालवीसाठी आवाज उठवला:प्राणघातक हल्ल्यातून थोडक्यात बचावलेल्या मालवीच्या समर्थनार्थ पुढे आली कंगना रनोट, म्हणाली - 'छोट्या शहरातून आलेल्या स्ट्रगलर्ससोबत असेच घडते'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाने याप्रकरणावर इंडस्ट्रीला लक्ष्य केले आहे.

टीव्ही अभिनेत्री मालवी मल्होत्रा हिच्यावर सोमवारी रात्री 9 वाजता मुंबईत चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. तिच्यावर सध्या कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणावर आता अभिनेत्री कंगना रनोट हिने प्रतिक्रिया दिली आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना कंगना म्हणाली, "प्रिय मालवी, मी तुझ्याबरोबर आहे, तुझी प्रकृती गंभीर आहे, हे माझ्या वाचनात आले आहे. मी तुझ्यासाठी प्रार्थना करते. माझी रेखा शर्मा यांना विनंती आहे की, दोषींवर लवकारत लवकर कारवाई व्हावी. आम्ही तुझ्या सोबत आहोत आणि आम्ही तुम्हा न्याय मिळवून देऊ. कृपया विश्वास ठेव'', असे कंगना मालवीला म्हणाली आहे.

पुढे कंगनाने याप्रकरणावर इंडस्ट्रीला लक्ष्य केले आहे. तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले, “हे फिल्म इंडस्ट्रीचे सत्य आहे. छोट्या शहरातून आलेल्या स्ट्रगलर्ससोबत असेच घडते. या स्ट्रगलर्सचे इंडस्ट्रीत कोणतेही कनेक्शन नसते. नेपोटिज्मची मुले यातून वाचतात, अशा किती जणांवर चाकूहल्ला होतो, बलात्कार केला जातो अथवा त्यांना जीवे मारले जाते?”, असा प्रश्न तिने विचारला आहे.

  • मालवीने कंगनाकडे मागितली होती मदत

मंगळवारी मालवीने माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रीय महिला आयोग आणि कंगना रनोट यांच्याकडे मदत मागितली होती. ती म्हणाली, "मी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांना या प्रकरणात लक्ष घालून मला मदत करण्याचे आवाहन करत. मी कंगनालादेखील मला पाठिंबा द्यावा अशी विनंती करते. मीही हिमाचलच्या मंडी शहरातून आहे. माझ्यासोबत ही घटना मुंबईत घडली. मी स्वप्नातदेखील असा विचार कधीच केला नाही. त्यामुळे माझ्यावर झालेल्या अन्यायासाठी मला तिचा पाठिंबा हवा आहे'', असे मालवी म्हणाली होती.

  • स्थानिक गार्जियनने सांगितली मालवीची सद्यपरिस्थिती

मुंबईतील मालवीचे गार्जियन अतुल पटेल यांनी सांगितल्यानुसार, मालवीच्या दोन्ही हात आणि पोटात चाकूचे वार आहेत. तिची प्रकृती आता स्थिर आहे. डॉक्टर लवकरच तिची प्लास्टिक सर्जरी करणार आहेत. पटेल म्हणाले की, मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदविला आहे. पोलिस योगेशच्या घरीही गेले परंतु तो तिथे सापडला नाही. आता त्याचा शोध सुरू आहे. उपचार पूर्ण झाल्यावर मालवीचे कुटुंब तिला परत घरी घेऊन जातील.

मालवीवर सध्या कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मालवीवर सध्या कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
  • सोमवारी रात्री ही घटना घडली

मालवीसोबतची घटना वर्सोवा येथे सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. जेव्हा ती कॅफेमधून घरी परतत होती. आतापर्यंत पोलिस तपासात हाती आलेल्या माहितीनुसार, योगेश कुमार नावाच्या व्यक्तीने प्रोडक्शनशी संबंधित कामाचे निमित्त करुन मालवीशी ओळख वाढवली. लग्नाचा प्रस्ताव तिच्यापुढे ठेवला. मालवीने मनोरंजनसृष्टीत करिअर करायचे आहे, लग्नाची घाई करू इच्छित नाही असे सांगत प्रस्ताव फेटाळला. तिचा नकार योगेशला सहन झाला नाही. मालवी घराच्या दिशेने चालत जात असताना योगेश ऑडी कार घेऊन तिच्या समोर आला. मालवीला अडवले. तिने पुन्हा एकदा योगेशला समजावण्याचा प्रयत्न केला. पण योगेशने काही ऐकून घेतले नाही. एकदम खिशातून चाकू काढला आणि मालवीच्या पोटात आणि हातावर चार वेळा वार केले. आसपास गर्दी होत असल्याचे लक्षात येताच तो कारमधून पळून गेला. स्थानिकांनी तातडीने जखमी मालवीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

याप्रकरणी पोलिसांनी मालवीची साक्ष नोंदवली आहे. तिने घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. तसेच योगेश फेसबुकवरुन सुरुवातीला ओळख वाढवत होता, असे सांगितले. योगेशने 2019 मध्ये फेसबुकद्वारे मालवीशी संपर्क साधला आणि लवकरच ओळख वाढवली. त्याचा लग्नाचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर मालवीने योगेशला फेसबुकवर ब्लॉक केले होते. पण योगेशने मालवीशी संपर्क साधण्याचा आणि तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मालवीचा विरोध कायम असल्याचे पाहून योगेशने चाकूने हल्ला केला. योगेशला दिसताक्षणी अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मालवीने 'कुमारी 21 एफ' या तेलगू चित्रपटासह तामिळ चित्रपट 'नदिक्कू एंडी' आणि 'हॉटेल मिलान' या हिंदी चित्रपटात काम केले आहे. याशिवाय ती 'उडान' या टीव्ही मालिकेतही झळकली. काही जाहिरातींमध्येही तिने काम केले आहे.