आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटाटा ग्रुपचे प्रसिद्ध ज्वेलरी ब्रांड तनिष्कच्या नव्या जाहिरातीवरुन वाद सुरु झाला आहे. या जाहिरातीवर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. जाहिरातीचा प्लॉट इंटरकास्ट मॅरेजवर आधारित आहे. यातून लव्ह जिहादला समर्थन देण्यात आल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. या जाहिरातीवर अभिनेत्री कंगना रनोट हिनेही नाराजी व्यक्त केली आहे.
हे लज्जास्पद आहे
कायम रोखठोक मत व्यक्त करणारी कंगना आपल्या पहिल्या ट्विटमध्ये म्हणाली, 'आपल्या श्रद्धांचा स्वीकार केल्याने एक हिंदू मुलगी घाबरत आपल्या सासरच्या व्यक्तींसमोर वावरते. ती घरातील सदस्य नाही का? ती त्यांच्यावर अवलंबून आहे असे का दाखवण्यात आले आहे? ती स्वत:च्या घरात अशी परकी का वाटत आहे?, लज्जास्पद आहे हे,' असे कंगानाने म्हटले आहे.
लव्ह जिहाद आणि लिंगभेदाचे समर्थन करते जाहिरात
तनिष्कच्या या जाहिरातीवर टीका करताना कंगनाने आपल्या पुढील ट्विटमध्ये लिहिले, 'ही जाहिरात अनेक पद्धतीने चुकीची वाटते. हिंदू सून मागील बऱ्याच काळापासून तिच्या सासरच्या लोकांबरोबर राहते मात्र जेव्हा ती त्यांना वंशाचा दिवा देणार असते तेव्हा तिचा स्वीकार केला जातो. ती फक्त मुलाला जन्म देण्यासाठी आहे का? ही जाहिरात केवळ लव्ह जिहाद नाही तर लिंगभेदाचेही समर्थन करते,' असे मत कंगनाने व्यक्त केले आहे.
क्रिएटीव्ह टेररिस्ट आपल्या मनामध्ये काय टाकत असतात?
पुढे कंगना म्हणते, 'एक हिंदू म्हणून हे क्रिएटीव्ह टेररिस्ट आपल्या मनामध्ये काय टाकत असतात याबद्दल आपण जागृक रहायला हवे. याबद्दल आपण विचारपूर्व चर्चा करायला हवी आणि त्यानंतर आपल्याला काही ठराविक विचार करायला भाग पाडले जाते का याचा विचार करायला हवा. आपली संस्कृती वाचवण्याचा हाच एकमेव मार्ग आहे,' असे कंगना म्हणाली आहे.
या जाहिरातीत काय?
तनिष्कच्या या प्रमोशनल जाहिरातीमध्ये एका हिंदू मुलीला मुस्लिम कुटुंबाच्या सूनेच्या रुपात दाखवण्यात आले आहे. हिंदू मुलीचे मुस्लिम घरात लग्न झाले आहे आणि तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम दाखवण्यात आला आहे. यामध्ये हिंदू कल्चर लक्षात घेता मुस्लिम कुटुंब सर्व प्रथा-परंपरा हिंदू धर्मानुसार करत आहे. जाहिरातीच्या शेवटी ती प्रग्नेंट महिला आपल्या सासूला विचारते, 'आई ही प्रथा तर तुमच्या घरात नसते ना?' यावर तिची सासू उत्तर देते की, 'पण मुलीला खूश करण्याची प्रथा तर सर्वच घरात असते ना?' व्हिडिओमध्ये हिंदू-मुस्लिम कुटुंबाची एकता दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे सांगितले जात आहे.
ही जाहिरात म्हणजे लव्ह जिहादचाचा प्रकार असल्याचा आरोप करत अनेकांनी तनिष्कवर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावरुन केली आहे. वाढता वाद बघता तनिष्कने ही जाहिरात सोशल मीडियावरुन काढून टाकली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.