आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीकू वेड्स शेरू:कंगना रनोटने सुरु केले 'टिकू वेड्स शेरू'च्या प्री-प्रोडक्शनचे काम, नवाजुद्दीन स्टारर चित्रपटाचे शूटिंग नोव्हेंबरपासून होईल सुरू

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपटाद्वारे कंगना निर्माती म्हणून डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट लवकरच 'टीकू वेड्स शेरू' हा चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटाद्वारे कंगना निर्माती म्हणून डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहे. या आगामी डार्क कॉमेडी चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत दिसणार आहे, चित्रपटाचे प्री-प्रोडक्शनचे काम कंगनाने तिच्या टीमसह सुरू केले आहे.

अलीकडेच, कंगनाने सोशल मीडियाद्वारे टिकू वेड्स शेरू चित्रपटाशी संबंधित माहिती शेअर करताना सांगितले की, मणिकर्णिका फिल्मच्या ऑफिसमध्ये टिकू वेड्स शेरूचे प्री-प्रोडक्शनचे काम सुरु झाले आहे. चित्रपटाचे शूटिंग नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होईल.शेअर केलेल्या फोटोमध्ये कंगना रनोट, तिचा भाऊ अक्षत रनोट आणि मणिकर्णिका फिल्मची टीम दिसत आहे.

शेरूच्या भूमिकेत दिसणार नवाजुद्दीन

या आगामी चित्रपटात नवाजुद्दीन शेरूच्या भूमिकेत दिसणार आहे. याची अधिकृत घोषणा जुलैमध्ये करण्यात आली. प्रॉडक्शन हाऊसने लिहिले होते, 'आमच्या पिढीतील सर्वोत्कृष्ट अभिनेता' टिकू वेड्स शेरू 'च्या टीममध्ये सामील झाला आहे. लवकरच 'टिकू वेड्स शेरू' चे शूटिंग सुरू होईल." कंगना रनोट हिनेदेखील नवाजुद्दीनचा एक फोटो शेअर करत टीममध्ये सहभागी झाल्याबद्दल त्याचे स्वागत केले होते. फोटोच्या कॅप्शनमध्ये कंगनाने लिहिले होते, 'टीममध्ये आपले स्वागत आहे सर.'

मणिकर्णिका फिल्म्स हे कंगना रनोटचे प्रॉडक्शन हाऊस असून या बॅनरखाली तयार होणाऱ्या टिकू वेड्स शेरूची निर्मिती डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी केली जात आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन साई कबीर करणार आहेत. आधी कंगनाला हा चित्रपट इरफान खानसोबत करायचा होता, मात्र त्यांच्या मृत्यूनंतर आता नवाजुद्दीनला चित्रपटासाठी फायनल करण्यात आले आहे.

'टीकू वेड्स शेरू' व्यतिरिक्त नवाजुद्दीन 'जोगीरा सारा रा' मध्ये नेहा शर्मासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय त्याचा 'बोले चुडियाँ' हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे. कंगनाच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ती 'धाकड', 'थलायवी', 'तेजस', 'मणिकर्णिका रिटर्न्स - द लीजेंड ऑफ दिद्दा' आणि 'इमर्जन्सी'मध्ये दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...