आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दीपिकावर कंगनाचा निशाणा:'वर्ल्ड मेंटल हेल्थ डे'ला कंगना रनोटने दीपिका पादुकोणवर साधला निशाणा, नाव न घेता म्हटले - डिप्रेशनची दुकान चालवणारी

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मीडिया बॅननंतर मार्केटिंग कॉम्प्लीकेशन्समुळे रीलीजपूर्वीच चित्रपटाचे नाव बदलण्यात आले होते.

वर्ल्ड मेंटल हेल्थ डेच्या निमित्ताने कंगना रनोटने आपल्या चाहत्यांना 'जजमेंटल है क्या' पाहण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच नाव न घेता दीपिका पादुकोणवर निशाणा साधला आहे. तिने ट्विटमध्ये लिहिले की, 'आम्ही जो चित्रपट मेंटल हेल्थ अवेयरनेससाठी बनवली होती, त्याला डिप्रेशनची दुकान चालवणाऱ्यांनी कोर्टात ओढले होते. मीडिया बॅननंतर मार्केटिंग कॉम्प्लीकेशन्समुळे रीलीजपूर्वीच चित्रपटाचे नाव बदलण्यात आले होते. पण हा चित्रपट चांगला आहे, हा आजच पाहा'

दीपिकाच्या एनजीओने केला होता टायटलचा विरोध
दीपिका पादुकोणची एनजीओ 'द लाइव्ह लव्ह लाफ फाउंडेशन'ने कथितरित्या कंगनाच्या फिल्मच्या टायटलवर (जे पहिले 'मेंटल है क्या' होते)वर प्रश्न उपस्थित केला होता. त्यांचे म्हणणे होते की, जे लोक मेंटल शब्दाचा वापर अपमानकारक रुपात करतात अशा लोकांना हे नाव प्रोत्साहन देते.

द लाइव्ह लव्ह लाफ फाउंडेशन व्यतिरिक्त 'द इंडियन सायकायट्रिक सोसायटी'च्या डॉक्टरांनीही सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांच्याकडे या चित्रपटाच्या शीर्षकास आक्षेप घेत तक्रार केली. या चित्रपटाचे शीर्षक मानसिक विकारांनी झगडत असलेल्या लोकांची चेष्टा करतात, असे ते म्हणाले होते.

हे शीर्षक नंतर 'जजमेंटल है क्या' करण्यात आले होते
या वादाचे पडसाद पाहून फिल्म निर्मात्यांनी 'मेंटल है क्या' या शीर्षकाची जागा 'जजमेंटल है क्या' केली. 26 जुलै 2019 रोजी कंगना आणि राजकुमार राव स्टारर फिल्म 'जजमेंटल है क्या' रिलीज झाली. प्रकाश कोवेलामुदी दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे 33 कोटींची कमाई केली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser