आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगनाच्या निशाण्यावर बॉलिवूडचे दिग्गज:करण जोहर, आदित्य चोप्राला म्हटले बॉलिवूडचे ठेकेदार, म्हणाली - ते लपून बसले आहेत, बॉलिवूडला वाचवण्यासाठी मी येत आहे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 23 एप्रिल रोजी 'थलायवी' हा चित्रपट प्रदर्शित होतोय.

पुन्हा एकदा कोरोना विषाणूने तीव्र रुप धारण केले आहे. गेल्या काही आठवड्यांत कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. अशा परिस्थितीत अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र कंगना रनोट स्टारर 'थलायवी' हा चित्रपट ठरलेल्या दिवशी म्हणजेच 23 एप्रिलला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. याविषयीची माहिती देत ​​अभिनेत्री कंगना रनोट हिने बॉलिवूडच्या दिग्गज निर्मात्यांना विशेषतः आदित्य चोप्रा आणि करण जोहर यांना लक्ष्य केले आहे. सोबतच तिने मोठ्या स्टार्सच्या नावाचा उल्लेख न करता त्यांच्यावरही निशाणा साधला आहे.

'कंगना बॉलिवूडला वाचवण्यासाठी येत आहे'
कंगनाने सोशल मीडियावर लिहिले, 'त्यांनी मला इंडस्ट्रीच्या बाहेर काढण्यासाठी सर्व प्रयत्न केले. माझ्या विरोधात गटबाजी केली, माझा छळ केला, मला त्रास दिला. पण आज बॉलिवूडचे ठेकेदार करण जोहर आणि आदित्य चोप्रा लपून बसले आहेत. सर्व मोठे हीरोदेखील आज लपून बसले आहेत. पण कंगना रनोट तिच्या टीमसह 100 कोटींच्या बजेटचा चित्रपट घेऊन बॉलिवूडला वाचवायला येत आहे.'

कंगनाने लिहिले- आई ही आईच असते
कंगना इथेच थांबली नाही. तिने पुढे लिहिले, 'इतिहासात सुवर्णाक्षरात ही नोंद होईल की, बाहेरुन आलेली आणि सावत्रपणाची वागणून मिळालेली एक व्यक्तीच त्यांची तारणहार ठरली. आयुष्य आपल्याला कधी कोणत्या वळणावर नेऊन ठेवेल हे आपण सांगू शकत नाही. जर असे झाले तर लक्षात ठेवा की बुलिवूडची ही चिल्लर पार्टी पुन्हा कधीही आपल्या आईविरूद्ध एकत्र येऊ शकणार नाही. कारण आई ही आईच असते.'

2 एप्रिल रोजी होईल चित्रपटातील पहिले गाणे बुधवारी ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर 'थलायवी' या चित्रपटाची प्रदर्शनाच्या तारखेत बदल होणार नसल्याचे सांगितले होते. त्यांनी लिहिले होते, 'कंगना रनोट स्टारर 'थलायवी'चे निर्माते ठरलेल्या तारखेलाच चित्रपट प्रदर्शित करणार आहेत. हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषेत हा चित्रपट 23 एप्रिल 2021 रोजीच प्रदर्शित केला जाईल. चित्रपटाचे पहिले गाणे 2 एप्रिलला लाँच होणार आहे.'

बातम्या आणखी आहेत...