आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चित्रपट समिक्षक व प्रेक्षकांकडून दाद मिळवणारा ‘जलीकट्टू’ हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत उतरला आहे. सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार समजल्या जाणा-या या पुरस्कार स्पर्धेसाठी देशभरातील 27 चित्रपटांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ‘जलीकट्टू’ हा मल्याळम चित्रपट अधिकृतरित्या ऑस्करसाठी भारताकडून पाठवण्यात आला आहे. फिचर फिल्म या विभागात नामांकन मिळवण्यासाठी हा चित्रपट प्रयत्न करणार आहे.
ही बातमी समोर येताच अभिनेत्री कंगना रनोट हिने बॉलिवूडला लक्ष्य करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपट माफिया टोळी त्यांच्या घरात लपून बसली असल्याने, ज्यूरीला त्यांचे काम करण्याची मुभा मिळाली आहे, असे म्हणत तिने बॉलिवूडवर टीका केली आहे.
All the scrutiny/ bashing Bullydawood gang got is finally yielding some results, Indian films aren’t just about 4 film families, movie mafia gang is hiding in their houses and letting juries do their job and congratulations team #Jallikattu https://t.co/kI9sY4BumE
— Kangana Ranaut (@KanganaTeam) November 25, 2020
14 सदस्यांच्या समितीने केली चित्रपटाची निवड
फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या 14 सदस्यांच्या समितीने ऑस्करसाठी दिग्दर्शक लिजो जोस पेलिसरी यांच्या 'जल्लीकट्टू' ची निवड केली आहे. जल्लीकट्टू हा चित्रपट बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म फॉरेन लँग्वेज कॅटेरगरीत भारताचे प्रतिनिधित्व करेल. ऑस्कर सोहळा 25 एप्रिल 2021 रोजी लॉस एंजेलिसमध्ये होणार आहे.
27 चित्रपटांमध्ये होती चुरस
93व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सहभगी होण्यासाठी हिंदी, उडिया, मराठी आणि इतर भाषांतील तब्बल 27 चित्रपटांमध्ये चुरस रंगली होती. या 27 चित्रपटांमधून अखेर ‘जल्लीकट्टू’ची निवड झाली आहे. या स्पर्धेत शुजित सरकार यांचा ‘गुलाबो सीताबो’, सफदर रेहाना यांचा ‘चिप्पा’, हंसल मेहता यांचा ‘छलांग’, चैतन्य ताम्हाणेंचा ‘द डिसायपल’, विधु विनोद चोप्रांचा ‘शिकारा’, अनंत महादेवन यांचा ‘बिटरस्वीट’, रोहेना गगेरांचा ‘इज लव्ह इनफ सर’, गीतू मोहनदास यांचा ‘मुथोन’, नीला माधव पांडा यांचा ‘कलिरा अतीता’, अनविता दत्त यांचा ‘बुलबुल’, हार्दिक मेहतांचा ‘कामयाब’ आणि सत्यांनु-देवांशु यांचा ‘चिंटू का बर्थ डे’ या चित्रपटांचा समावेश होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.