आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगनाचा निशाणा:शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांजवळ मिळाले पाकिस्तानचे क्रेडिट कार्ड, कंगना म्हणाली - 'इंडिया पाकिस्तान न बन जाए'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या क्रेडिट कार्डवर प्रताप सरनाईक यांचा पत्ता आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट हिने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर निशाणा साधला आहे. झाले असे की, मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची चौकशी सुरू आहे. ईडीने टाकलेल्या धाडीमध्ये सरनाईक यांच्या घरातून पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या क्रेडिट कार्डवर प्रताप सरनाईक यांचा पत्ता आहे. कंगनाने मुंबईची पाकव्याप्त काश्मिरशी तुलना केल्यानंतर सरनाईकांनी तिला धमकावले होते. त्यावरुन आता कंगनाने प्रताप सरनाईकांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

कंगनाने तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये प्रताप सरनाईकांवर निशाणा साधत लिहिले आहे, "जेव्हा मी मुंबईत पीओकेसारखं वाटतं, असे म्हटले होते, तेव्हा त्यांनी माझे थोबाड फोडण्याची धमकी दिली होती. भारत त्या लोकांना ओळखतो, जे तुमच्यासाठी बलिदान देतात आणि जे तुमच्याकडून सर्व काही हिसकावूनही घेतात. तुम्ही जिथे विश्वास ठेवता तिथे तुमचे भविष्य आहे. इंडिया पाकिस्तान ना बन जाए', अशा आशयाची पोस्ट कंगनाने शेअर केली आहे.

सरनाईकांनी कंगनाविषयी काय म्हटले होते

कंगंनाने जेव्हा मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती, तेव्हा प्रताप सरनाईक यांनीदेखील कंगनाच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करत तिला इशारा दिला होता. “कंगनाला खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलिब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांकडे मागणी करणार आहे,” असे त्यांनी म्हटले होते. मात्र त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रीय महिला आयोगने नाराजी व्यक्त केली होती. महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी त्यांना अटक करण्याची मागणी केली होती.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser