आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगनाच्या निशाण्यावर आता आमिर:कंगनाने आमिर खानला टॅग करत ट्विटरवर प्रश्न विचारला - 'इंटॉरलन्स गँगला या देशात किती त्रास सहन करावा लागला?'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाने आपल्या या ट्विटच्या बहाण्याने आमिरला त्याच्या नोव्हेंबर 2015 च्या एका विधानाची आठवण करून दिली, ज्यात त्याने म्हटले होते की, या देशात त्याला असुरक्षितता आणि भीती वाटते.

अभिनेत्री कंगना रनोट हिच्याविरोधात मुंबईत आणखी एक एफआयआर दाखल झाल्यानंतर तिने आता आमिर खानला लक्ष्य केले आहे. कंगनाने आपल्या नुकत्यात एका ट्विटमध्ये आमिर खानला टॅग केले आहे. आपल्या ट्विटमध्ये तिने लिहिले, "इंटॉरलन्स गँगला जाऊन कुणी विचारा की, या इंटॉरलंट देशात त्यांना किती त्रास सहन करावा लागला?", असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे. कंगनाच्या या ट्विटमुळे पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे.

  • महाराष्ट्र सरकारला म्हटले फॅसिस्ट

कंगनाने आपल्या दुसर्‍या ट्विटमध्ये महाराष्ट्र सरकारला फॅसिस्ट म्हटले आहे. तिने लिहिले, "कँडल मार्च गँग, अवॉर्ड रिटर्न गँग जरा बघा फॅसिझमचा विरोध करणा-या क्रांतिकारकांसोबत काय होतंय? तुमच्यासारखा प्रत्येकजण नाही. कोणीही तुम्हाला विचारत नाही. माझ्याकडे पहा, माझ्या जीवनाचा उद्दिष्ट महाराष्ट्राच्या फॅसिस्ट सरकारशी लढा देणे हा आहे. तुमच्याप्रमाणे इतरांची फसवणुक करणे नव्हे", अशा आशयाचे ट्विट तिने केले आहे.

  • 'मी तुरुंगात जाण्याची वाट पाहात आहे'

कंगना इथवरच थांबली नाही तर तिने आपला छळ करणा-या प्रशासनाला धारेवर धरले आहे. आपल्या पुढच्या ट्विटमध्ये ती म्हणाली, "मी सावरकर, सुभाषचंद्र बोस आणि झाशीच्या राणीची पूजा करते. सध्या मला हे प्रशासन सातत्याने तुरुगांत टाकण्यासाठी प्रयत्न करत आहे. याचे कारण म्हणजे मी माझ्या मतावर ठाम असणे हे आहे. त्यामुळे मी आता तुरुंगात जाण्यासाठी तयार आहे. त्या क्षणाची मी वाट पाहात आहे", असे ट्विट तिने केले आहे.

  • गुरुवारी कंगनाविरोधात तक्रार दाखल झाली

कंगनाविरोधात गुरुवारी मुंबईत आणखी एक एफआयआर दाखल झाला आहे. मुंबईतील वकील अली काशिफ खान यांनी अंधेरी काेर्टात तिच्याविरोधात गुन्हेगारी तक्रार दाखल केली आहे. कंगनाने वांद्रे मॅजिस्ट्रेट काेर्टाकडून तिच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याच्या आदेशानंतर साेशल मीडियावर न्यायपालिकेविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे खान यांनी मुंबईच्या अंधेरी काेर्टात दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे. कंगनावर देशद्राेह आणि समाजात द्वेष पसरवण्याचाही आरोप करत त्यांनी ती सोशल मीडियाचा गैरवापर करत असल्याचे सांगितले. कंगना समाज, कायदा, तपास यंत्रणा व न्यायपालिकेची थट्टा करत आहे, असे खान म्हणाले आहेत. काेर्ट या प्रकरणात 10 नोव्हेंबरला सुनावणी करणार आहे. वांद्रे कोर्टाच्या आदेशावरून मुंबई पोलिसांनी कंगनावर गुन्हा दाखल केला. तिला 26-27 ऑक्टोबरला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे.