आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनुष्का-गावसकर वादात कंगनाची उडी:गावसकरांच्या वक्तव्याचा निषेध करत अनुष्कावर साधला निशाणा, म्हणाली -  मला हरामखोर म्हटले गेले तेव्हा तू शांत राहिली

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाने आपल्या ट्विटमध्ये अनुष्कासाठी लिहिले - सेलेक्टिव फेमिनिझम चांगले नाही.
  • काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना रनोटवर 'हरामखोर मुलगी' म्हणून टीका केली होती.

अभिनेत्री कंगना रनोट हिने माजी कर्णधार सुनील गावसकर आणि अनुष्का शर्मा यांच्यातील वादात उडी घेतली आहे. तिने गावसकरांनी केलेल्या विधानाचा निषेध नोंदवला आहे. शुक्रवारी रात्री तिने ट्विट करत याविषयी आपले मत व्यक्त करताना अनुष्कावरदेखील निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटमध्ये कंगनाने लिहिले, “जेव्हा मला धमक्या देण्यात आल्या आणि मला हरामखोर संबोधले गेले, त्यावेळी अनुष्का शांत राहिली. पण आता काहीसा तसाच आक्षेपार्ह प्रकार तिच्याबाबतीत घडला आहे. सुनील गावसकर यांनी क्रिकेटच्या सामन्यात तिचा असा उल्लेख करण्याचा मी निषेध करते. पण त्याचसोबत, सर्वच स्त्रियांचा आदर व्हायला हवा. काही स्त्रियांना वेगळा न्याय आणि काहींना वेगळा न्याय ही बाब बरोबर नाही”, असे ट्विट तिने केले आहे.

कंगनाने आपल्या दुसर्‍या ट्विटमध्ये लिहिले की, “नॅशनल टीव्हीवर गावसकर यांनी समालोचनाच्या वेळी केलेल्या टिप्पणीमध्ये केवळ वाईट मनोवृत्तीच्या लोकांनाच सेक्सुअल कॉन्टेक्स्ट असल्यासारखे वाटू शकते. एक गोष्ट मात्र नक्की की त्यांनी अनुष्काचा उल्लेख करायला नको होता. अनुष्का तिच्या पुढील प्रोजेक्टमध्ये क्रिकेटपटूची भूमिका साकारत आहे आणि ती तिचा पती विराटसोबत क्रिकेटचा सराव करतानाचे अनेक व्हिडिओ आहेत', असेही कंगना म्हणाली.

  • काय म्हणाले होते गावसकर?

माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाबच्या सामन्यात समालोचन करताना विराट कोहलीवर टीका करताना अनुष्काचाही उल्लेख केला होता. विराटने केएल राहुलचे कॅच सोडले होते. त्यावर 'विराटने लॉकडाऊनमध्ये केवळ अनुष्काच्या चेंडूंवर प्रॅक्टिस केली", असे विधान गावसकरांनी केले होते. टीकेनंतर चाहत्यांनी गावसकर यांना धारेवर धरले आणि त्यांना समालोचनाच्या पॅनलमधून काढून टाकण्याची मागणीदेखील बीसीसीआयला केली. गावसकर यांच्या विधानावर अनुष्का नाराजी व्यक्त केली होती.

  • काय म्हणाली अनुष्का शर्मा?

अनुष्काने सोशल मीडियावर लिहिले की, ''मिस्टर गावसकर तुमचे म्हणणे खूप वाईट आहे. तुम्ही अशी प्रतिक्रिया का दिली हे मला तुम्हाला विचारायचे आहे. एक क्रिकेटरच्या खेळासाठी त्याच्या पत्नीला दोषी का ठरवले जातेय? मला विश्वास आहे की, गेल्या काही वर्षांत समालोचनादरम्यान प्रत्येक क्रिकेटरच्या वैयक्तिक व खासगी जीवनाला त्याच्या खेळापासून दूर ठेवले असेल. माझ्या व विराटच्या बाबतीत पण असे काही असावे असे तुम्हाला नाही का वाटते? माझ्या पतीने काल रात्री सामन्यात केलेल्या खराब कामगिरीवर बोलायला तुमच्याकडे काही शब्द व वाक्य असणे गरजेचे आहे. यात माझे नाव जोडणे गरजेचे होते? 2020 मध्ये माझ्या जीवनात काही बदल झाला आहे. खेळाच्या बाबतीत माझे नाव ओढणे केव्हा बंद केले जाईल? केव्हा अशा टीका बंद होतील? आदरणीय मिस्टर गावसकर, तुम्ही एक महान खेळाडू आहात. या जंटलमन खेळात तुमचे नाव खूप मोठे आहे. मी केवळ तुम्हाला जाणीव करून देत आहे की त्या टीकेमुळे मला वाईट वाटतेय.''

  • आता गावसकर यांच्याकडून घूमजावचा प्रयत्न

या मुद्द्यावर चेन्नई वि. दिल्ली सामन्यात समालोचन करताना गावसकर यांनी आपले रोखठोक मत व्यक्त केले. “मी विराटच्या अपयशासाठी अनुष्काला जबाबदार ठरवले नाही. मी कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह टिप्पणी केलेली नाही. लॉकडाऊनमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये अनुष्का विराटला गोलंदाजी करत होती. त्याबद्दल बोलताना अनुष्काने विराटला गोलंदाजी केली असे मी म्हटले होते. त्यात मी अनुष्काला दोषी ठरवले नव्हते. लॉकडाऊन काळात विराटने एवढीच गोलंदाजी खेळली होती”, असेही गावसकर म्हणाले.

अनुष्का आणि विराटच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका करत असेल तर हा घाणेरडा प्रकार आहे असे म्हणत काही चाहत्यांनी गावसकर यांना आपल्या प्रतिक्रियेवर माफी मागण्यास सांगितले.

बातम्या आणखी आहेत...